सातारा जिल्ह्याच्या रुग्ण व्यवस्थापन प्रणालीचे सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते ऑनलाईन उद्घाटन

 


मुंबई, दि. 29 : सातारा जिल्ह्यातील सर्व कोविड-19 रुग्णांसाठी जिल्ह्यात केंद्रीय रुग्ण व्यवस्थापन प्रणाली सुरू केली आहे. या रुग्ण व्यवस्थापन प्रणालीचे सहकार व पणन मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते मंत्रालयात ऑनलाईन उद्घाटन करण्यात आले.

श्री. पाटील म्हणाले, सातारा जिल्ह्यातील कोविड-१९ मुळे होणारा मृत्युदर कमी करण्यासाठी सर्व यंत्रणांनी प्रयत्न करावेत, ही केंद्रीय रुग्ण व्यवस्थापन प्रणाली असून या covid19satara.in लिंक द्वारे रुग्णालयातील बेडची माहिती उपलब्ध होणार आहे.  एखाद्या तालुक्यात बेड उपलब्ध नसेल तर दुसऱ्या तालुक्याच्या ठिकाणी  रुग्णालयात बेड उपलब्ध आहे का नाही याची माहिती मिळू शकते आणि बेडआभावी उपचार न मिळण्याच्या अडचणी दूर होण्यास मदत  होईल, असेही श्री. पाटील यांनी सांगितले.

यावेळी कोर ओशन सोल्युशन्स एलएलपीचे व्यवस्थापकीय संचालक मोहित तोडकर यांनी सादरीकरण केले. याबद्दल  काही अडचण आली तर  टोल फ्री  क्रमांक 1077 हा  सुद्धा उपलब्ध करून देण्यात आला आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area