कृषी यांत्रिकीकरण अनुदानाच्या लाभासाठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज करावेतकोल्हापूर, दि. 29  : कृषी यांत्रिकीकरण उप अभियानांतर्गत अनुदानाचा लाभ घेण्यासाठी इच्छुक शेतकऱ्यांनी आपले अर्ज mahadbtmahait.gov.in या पोर्टलवर अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी ज्ञानदेव वाकुरे यांनी केले आहे.
शेतकऱ्यांची पोर्टलवर नोंदणी व अर्ज सादर करण्याची कार्यपध्दती बाबतची माहिती पोर्टलवर ‘ऑनलाईन अर्ज प्रक्रियेसाठी सूचना’ या सदराखाली देण्यात आली आहे. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांमधील सर्व कृषी अवजारे निवडीसाठी उपलब्ध राहतील. ट्रॅक्टरसाठी दिनांक 14 जुलै 2020 चे शासन निर्णयानुसार अनु.जाती, अनु.जमाती, अल्प व अत्यल्प भूधारक आणि महिला शेतकरी यांना किमतीच्या 50 टक्के किंवा रु. 1.25 लाख यापैकी कमी असेल ते आणि इतर शेतकऱ्यांसाठी किमतीच्या 40 टक्के किंवा रक्कम रुपये 1 लाख यापैकी कमी असेल ते याप्रमाणे अनुदान मर्यादा राहील.
केंद्र शासनाच्या मान्यताप्राप्त संस्थांकडून तपासणी केलेल्या ट्रॅक्टर, पॉवर टिलर व अवजारांची यादी farmech.dac.gov.in या पोर्टलवर वेळोवेळी अद्ययावत करण्यात येते. या यादीमध्ये समाविष्ठ असलेली किंवा ट्रॅक्टर, पॉवर टिलर वगळता इतर अवजारांच्या बाबतीत केंद्र शासनाच्या मान्यताप्राप्त तपासणी संस्थेकडील वैध तपासणी अहवाल उपलब्ध असलेल्या अवजारांनाच अनुदान अनुज्ञेय आहे.
कार्यक्रमाचे लक्षांक ऑनलाईन पध्दतीने शासनाच्या mahadbtmahait.gov.in या संकेतस्थळावर देण्यात येणार आहेत. अधिक माहितीसाठी आपल्या तालुक्यातील कृषी सहाय्यक, मंडळ कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी अथवा उपविभागीय कृषी अधिकारी यांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area