मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन उत्साहात साजरा; पालकमंत्री नवाब मलिक यांच्या हस्ते ध्वजारोहण

 


परभणी, दि. 18 :- मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त राज्याचे अल्पसंख्याक विकास व औकाफ, कौशल्य विकास व उद्योजकता विभागाचे मंत्री तथा परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री नवाब मलिक यांनी स्मृतिस्तंभास पुष्पचक्र अर्पण करुन आदरांजली वाहिली. त्यानंतर मुक्ती संग्रामातील हुतात्मांना पोलीस दलाच्या पथकाने बंदुकीच्या तीन फैरी झाडून मानवंदना देण्यात आली.  पालकमंत्री नवाब मलिक यांच्या हस्ते यावेळी ध्वजारोहण करण्यात आले.

मराठवाडा मुक्ती संग्राम दिनोत्सवाचा मुख्य शासकीय समारंभ आज राजगोपालाचारी उद्यानातील स्मृतीस्तंभ येथे संपन्न झाला. यावेळी  महापौर श्रीमती अनिताताई सोनकांबळे, आमदार सुरेश वरपुडकर, आमदार डॉ.राहूल पाटील, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा श्रीमती निर्मलाताई विटेकर, उपाध्यक्ष अजय चौधरी,  जिल्हाधिकारी दी.म.मुगळीकर, जिल्हा पोलिस अधिक्षक कृष्णकांत उपाध्याय, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पृथ्वीराज बी.पी., महानगरपालिका आयुक्त देविदास पवार,  मुक्ती संग्रामातील स्वातंत्रता सेनानी, त्यांचे कुटुंबीय, महिला, विद्यार्थी, युवक, शासकीय अधिकारी, कर्मचारी, पत्रकार आणि नागरिक आदि उपस्थित होते. पालकमंत्री श्री.मलिक यांनी सोहळ्यानंतर उपस्थित स्वातंत्र्य सेनानी, नागरिकांची भेट घेऊन त्यांना मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त परभणी शहरातील क्रांती चौकातील हुतात्मा स्तंभास  व ज्येष्ठ स्वातंत्र सैनिक कै.आर.बी.देशपांडे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अपर्ण करुन अभिवादनही करण्यात आले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area