राजेंद्र पाटील यड्रावकर सोशल फाउंडेशनच्या पुढाकाराने जयसिंगपूर येथे अद्ययावत कोविड सेंटरचे निर्माण

 


मुंबई, दि. 19 : राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या माध्यमातून सुरू झालेला जयसिंगपूर पॅटर्न राज्यात आदर्शवत ठरेल असे गौरवोद्गार नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी आज कोविड सेंटरच्या लोकार्पण सोहळ्या प्रसंगी काढले. जयसिंगपूर येथे राजेंद्र पाटील यड्रावकर सोशल फाउंडेशन यांच्या सौजन्याने १० व्हेंटिलेटर आणि १०० ऑक्सिजन बेडच्या मोफत अद्ययावत कोविड सेंटर तयार करण्यात आले आहे.

सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाईन लोकार्पण सोहळा झाला. त्यावेळी मंत्री श्री. शिंदे बोलत होते. ते म्हणाले, लोकसहभागातून उभारण्यात आलेले हे सेंटर अद्ययावत असून कोविड काळात याची आवश्यकता होती. ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्या विरोधात प्रत्येकाला लढायचे आहे, त्यासाठी प्रत्येकाने काळजी घेतली पाहिजे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याच्या संकल्पनेतील माझे कुटुंब, माझी जबाबदारी हे अभियान आणि आरोग्य विभागाच्या माध्यमातून दिलेल्या सूचनांची अमंलबजावणी करून आपण कोरोना सारख्या जागतिक महामारी विरोधात यशस्वीपणे लढा उभारू असे श्री. शिंदे यांनी सांगितले.

जयसिंगपूर नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर यांच्या संकल्पनेतून राजेंद्र पाटील यड्रावकर सोशल फाउंडेशन तसेच शिरोळ तालुक्यातील, जयसिंगपूर परिसरातील दानशूर व्यक्ती व संस्था यांच्या सौजन्याने सिद्धीविनायक मंदिर ट्रस्ट सभागृह जयसिंगपूर येथे हे कोविड सेंटर उभारण्यात आले आहेत. राज्यमंत्री श्री. यड्रावकर यांनी केलेल्या या विशेष प्रयत्नामुळे शिरोळ तालुक्यातील कोरोना बाधीत रुग्णांना तातडीने आणि योग्य उपचार मिळू शकतील.

यावेळी शिरोळचे नगराध्यक्ष अमरसिंह पाटील, जिल्हाधिकारी दौलत देसाई, जिल्हा पोलिस प्रमुख अभिनव देशमुख, जि.प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल व मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area