पनवेल तालुक्यातील एमआयडीसीच्या विकास कामांचा राज्यमंत्री आदिती तटकरे यांनी घेतला आढावा

 


मुंबई, दि. 17 : पनवेल तालुक्यातील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने (एमआयडीसी) पाईप लाईनसाठी संपादित केलेल्या मौ.चाळ येथील स्थानिकांना ३० वर्षांपासून प्रलंबित भाडे व त्याची नुकसान भरपाई लवकर देण्यात यावी अशा सूचना उद्योग राज्यमंत्री आदिती तटकरे यांनी दिल्या.

मंत्रालयात आज पनवेल तालुक्यातील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या विकास कामांची बैठक पार पडली. बैठकीला आमदार बाळाराम पाटील उपस्थित होते.

कुमारी  तटकरे म्हणाल्या, स्थानिकांच्या अडचणी समजून घेऊन त्यांना मदत करावी तसेच कोळवडी, पाली बुद्रुक व घोटचाळ रस्ता या दोन्ही प्रकल्पांच्या भूसंपादनाबाबत एक स्वतंत्र बैठक ऑनालाईन घेण्यात यावी असेही त्यांनी यावेळी सांगितले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area