शिवाजी तंत्र विद्यालयात प्रवेश सुरू

 


कोल्हापूर, दि. 24  : शिवाजी तंत्र विद्यालयात इ. 11 वीसाठी ॲटोमोबाईल टेक्नॉलॉजी-30, मेकॅनिकल टेक्नॉलॉजी-30 व इलेक्ट्रीकल टेक्नॉलॉजीच्या 30 जागांसाठी प्रवेश सुरू असल्याची माहिती शिवाजी तंत्र विद्यालयाचे मुख्याध्यापक व्ही.व्ही. राजगुरू यांनी दिली.
हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर कंपनीमध्ये ऍप्रेंटिसशिप मिळू शकते. 12 वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना इंजिनिअरींग डिप्लोमाच्या थेट दुसऱ्या वर्षात प्रवेश मिळू शकतो. 12 वी ची परीक्षा महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळामार्फत घेण्यात येते. तसेच विद्यार्थ्यास शासनाकडून संस्थेमार्फत व्यवसाय प्रमाणपत्र देण्यात येते.
या अभ्यासक्रमासाठी शासकीय नियमानुसार अत्यंत अल्प फी असून शासकीय शिष्यवृत्तीचा लाभ घेता येतो. इच्छूक विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष संस्थेशी सकाळी 11 ते 5 या वेळेत संपर्क साधावा. अधिक माहितीसाठी दूरध्वनी क्र. 0231-2644325 व मोबाईल क्र. 9423043096 (वाघमारे सर) यांच्याशी संपर्क साधावा.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area