वीज मंडळातील तीनही कंपन्यामधील कंत्राटी कामगारांच्या मागण्याबाबत सकारात्मक विचार करणार – ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे मुंबई, दि.३० : राज्यातील वीज मंडळातील महावितरण, महानिर्मिती आणि महापारेषण या तीन कंपनीतील कंत्राटी कामगारांच्या विविध मागण्यांसाठी सकारात्मक विचार करण्यात येणार असल्याचे ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी सांगितले.

 

हाँगकाँग बँक इमारत येथे वीज मंडळातील कंत्राटी कामगारांच्या विविध मागण्यांसाठी आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी महावितरणचे मुख्य कार्यकारी संचालक असिम गुप्ता, महानिर्मिती श्री.खंडारे यांच्यासह पी.के.गंजो, श्री.मेनथा, श्री.गमरे यांच्यासह तीनही कंपनीचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

 

श्री.तनपुरे यांनी यावेळी कंत्राटी कामगारांच्या मागण्या, समस्या समजून घेतल्या. त्यांचे होणारी शोषण थांबवण्यासाठी तिन्ही कंपनीच्या वरिष्ठ अधिकारी यांना याविषयीची अधिक माहिती घ्यावी, अशा प्रकारच्या सूचना देण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.

 

तीनही कंपन्या मिळून ३८ हजार कंत्राटी कामगार कार्यरत असून कोणत्याही कामगारांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कामावरून काढण्यात येवू नये, अशा प्रकाच्या सूचना देण्यात येतील. कामगारांच्या सेवा जेष्ठतेला प्राधान्य देण्यात येईल. इतरही मागण्याबाबत सकारात्मक विचार करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

 

 ग्राम विद्युत व्यवस्थापकांना नियमित मानधन मिळणार

 

राज्यात कार्यरत असणाऱ्या ग्राम विद्युत व्यवस्थापकांना नियमित मानधन देण्याच्या सूचना संबंधित अधिकारी यांना देण्यात आले आहे. तसेच त्यांच्या कामात येणाऱ्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न केला जाईल असेही त्यांनी यावेळी सांगितले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area