‘अंगणवाडी ताई’ म्हणजे ‘कोविड योद्धा’च, त्यांचा योग्य सन्मान करणार – महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर

 


मुंबईदि३०: राज्यभरात ‘अंगणवाडी ताईं’नी कोविड कालावधीत अतिशय कौतुकास्पद कामगिरी बजावली आहेत्या ‘कोविड योद्धा’ आहेतत्यांना योग्य सन्मानप्रोत्साहन मिळेलअसे उपक्रम विभागाकडून राबविले जातीलअशा महिला  बालविकास मंत्री ॲडयशोमती ठाकूर आज म्हणाल्या.

 

मंत्री ॲडठाकूर यांची आज युनिसेफच्या श्रीमती राजलक्ष्मी नायर  श्रीमती अल्पा व्होरा यांनी भेट घेतलीयावेळी राज्यातील बालकेकिशोरवयीन मुलीअंगणवाडी ताई यांच्याकरिता भविष्यात करता येणाऱ्या कार्यक्रमांबाबत चर्चा झाली.

यावेळी बोलताना ॲडठाकूर म्हणाल्याकोरोना काळात अंगणवाडी ताईंनी घराघरात सर्वेक्षणपोषण आहार यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली आहेत्यांचा योग्य सन्मान केला जाईलआदिवासी भागातील अंगणवाडी सेविकापर्यवेक्षिका यांच्याशी झूम कॉलद्वारे संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या जातीलबंद झालेल्या लोकाभिमुख योजना पुन्हा सुरु करण्याबाबत आढावा घेण्यात येईलअसेही त्या म्हणाल्या.

बालविवाह ही चिंतेची बाब असल्याचे सांगून ॲडठाकूर यांनी म्हणाल्या कीबालविवाहांना आळा घालण्यासाठी कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीबरोबरच मानसिकतेमध्ये बदल होणे गरजेचे आहेत्यासाठी प्रबोधन आणि इतर उपाययोजनांच्या अनुषंगाने लवकरच बैठक घेण्यात येईल१८ व्या वर्षी अनाथगृहातून बाहेर पडणाऱ्या मुलांच्या भविष्याकरिता ठोस कार्यक्रम राबवण्यात येणार आहेआरोग्यआदिवासी विकासशिक्षणगृह अशा शासनाच्या विविध विभागांचा समन्वय साधत महिला  बालकांच्या विकासासाठी रोडमॅप युनिसेफकडून तयार करण्यात येणार आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area