338 नागरिकांना दिला आज डिस्चार्ज; 498 जणांचे नमुने पाठविले तपासणीला

 


सातारा दि. 12 : जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज संध्याकाळपर्यंत 338 नागरिकांना घरी सोडण्यात आले असून 498 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
498 जणांचे नमुने पाठविले तपासणीला
स्व. क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातारा येथील 49, कराड येथील 15, फलटण येथील 22, कोरेगाव येथील 27, वाई येथील 33, खंडाळा येथील 65, रायगाव येथील 37, पानमळेवाडी येथील 27, मायणी येथील 9, महाबळेश्वर येथील 3, पाटण येथील 19, दहिवडी येथील 13, खावली येथील 7, तळमावले येथील 32, म्हसवड येथील 29 व कृष्णा मेडिकल कॉलेज कराड येथे 111 असे एकूण 498 जणांचे नमुने तपासणीला पाठविण्यात आले आहे, अशी माहितीही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
घेतलेले एकूण नमुने – 163114
एकूण बाधित -- 41834
घरी सोडण्यात आलेले ---33871
मृत्यू -- 1374
उपचारार्थ रुग्ण -- 6589

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area