आजअखेर 34 हजार 864 जणांना डिस्चार्ज

 


कोल्हापूर, दि. 2 : आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत आरटीपीसीआर आणि सीबीएनएएटी चाचणीचे 1 हजार 26 प्राप्त अहवालापैकी 841 निगेटिव्ह तर 179 अहवाल पॉझीटिव्ह आहेत. (6 अहवाल नाकारण्यात आले) अॅन्टीजेन टेस्टिंग चाचणीचे 311 प्राप्त अहवालापैकी 267 निगेटिव्ह तर 44 पॉझीटिव्ह (79 निगेटिव्ह अहवाल आरटीपीसीआरसाठी तपासणीसाठी पाठविले), खासगी रुग्णालये/लॅब मध्ये 406 प्राप्त अहवालापैकी 313 निगेटिव्ह तर 93 पॉझीटिव्ह असे एकूण 316 अहवाल पॉझीटिव्ह आहेत.
जिल्ह्यात आजअखेर एकूण 45 हजार 59 पॉझीटिव्हपैकी 34 हजार 864 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आजअखेर जिल्ह्यात एकूण 8 हजार 729 पॉझीटिव्ह रुग्ण आहेत.
आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत प्राप्त 316 पॉझीटिव्ह अहवालापैकी आजरा-1, भुदरगड- 11, चंदगड-19, गडहिंग्लज-24, गगनबावडा-2, हातकणंगले- 24, कागल-5, करवीर-26, पन्हाळा- 4, राधानगरी-11, शाहूवाडी-20, शिरोळ-2, नगरपरिषद क्षेत्र- 49, कोल्हापूर महापालिका क्षेत्र- 91 व इतर शहरे व राज्य 27 असा समावेश आहे.
आजअखेर तालुका,नपा आणि मनपा क्षेत्रनिहाय रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे - आजरा-797, भुदरगड- 1115, चंदगड- 1045, गडहिंग्लज- 1281, गगनबावडा- 130, हातकणंगले-4931, कागल-1549, करवीर-5210, पन्हाळा- 1746, राधानगरी-1176, शाहूवाडी-1208, शिरोळ- 2334, नगरपरिषद क्षेत्र-6930, कोल्हापूर महापालिका क्षेत्र- 13 हजार 652 असे एकूण 43 हजार 104 आणि इतर जिल्हा व राज्यातील – 1 हजार 955 असे मिळून एकूण 45 हजार 59 रुग्णांची आजअखेर जिल्ह्यात संख्या आहे.
जिल्ह्यातील एकूण 45 हजार 59 पॉझीटिव्ह रूग्णांपैकी 34 हजार 864 रूग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. तर एकूण 1 हजार 466 जणांचा मृत्यू झाला असल्यामुळे आजअखेर उपचारार्थ दाखल झालेल्या जिल्ह्यातील रूग्णांची संख्या 8 हजार 729 इतकी आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area