काल अखेर 35 हजार 603 जणांना डिस्चार्ज


कोल्हापूर, दि. 5  : काल संध्याकाळी 5 वाजेपर्यंत आरटीपीसीआर आणि सीबीएनएएटी चाचणीचे 700 प्राप्त अहवालापैकी 594 निगेटिव्ह तर 101 अहवाल पॉझीटिव्ह आहेत. (5 अहवाल नाकारण्यात आले) अॅन्टीजेन टेस्टिंग चाचणीचे 257 प्राप्त अहवालापैकी 222 निगेटिव्ह तर 32 पॉझीटिव्ह (65 निगेटिव्ह अहवाल आरटीपीसीआरसाठी तपासणीसाठी पाठविले), खासगी रुग्णालये/लॅब मध्ये 251 प्राप्त अहवालापैकी 144 निगेटिव्ह तर 107 पॉझीटिव्ह असे एकूण 240 अहवाल पॉझीटिव्ह आहेत.

जिल्ह्यात कालअखेर एकूण 45 हजार 595 पॉझीटिव्हपैकी 35 हजार 603 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. कालअखेर जिल्ह्यात एकूण 8 हजार 503 पॉझीटिव्ह रुग्ण आहेत.
काल संध्याकाळी 5 वाजेपर्यंत प्राप्त 210 पॉझीटिव्ह अहवालापैकी आजरा-1, भुदरगड- 14, चंदगड-12, गडहिंग्लज-6, हातकणंगले- 22, कागल-10, करवीर-46, पन्हाळा- 4, राधानगरी-3, शाहूवाडी-1, शिरोळ-2, नगरपरिषद क्षेत्र- 33, कोल्हापूर महापालिका क्षेत्र- 72 व इतर शहरे व राज्य 14 असा समावेश आहे.
कालअखेर तालुका,नपा आणि मनपा क्षेत्रनिहाय रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे - आजरा-799, भुदरगड- 1139, चंदगड- 1065, गडहिंग्लज- 1297, गगनबावडा- 130, हातकणंगले-4993, कागल-1566, करवीर-5303, पन्हाळा- 1755, राधानगरी-1182, शाहूवाडी-1216, शिरोळ- 2353, नगरपरिषद क्षेत्र-7004, कोल्हापूर महापालिका क्षेत्र- 13 हजार 804 असे एकूण 43 हजार 606 आणि इतर जिल्हा व राज्यातील – 1 हजार 989 असे मिळून एकूण 45 हजार 595 रुग्णांची कालअखेर जिल्ह्यात संख्या आहे.
जिल्ह्यातील एकूण 45 हजार 595 पॉझीटिव्ह रूग्णांपैकी 35 हजार 603 रूग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. तर एकूण 1 हजार 489 जणांचा मृत्यू झाला असल्यामुळे 
कालअखेर उपचारार्थ दाखल झालेल्या जिल्ह्यातील रूग्णांची संख्या 8 हजार 503 इतकी आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area