कागल तालुक्यातील 39 आणि करवीर तालुक्यातील 55 गावात होणार भूमापन मालमत्तेची बिनचूक मोजणी करण्यासाठी घर मालकाने उपस्थित राहून सहकार्य करावे - जिल्हाधिकारी दौलत देसाईकोल्हापूर, दि. 22 : जिल्ह्यातील कागल तालुक्यातील 39 गावातील आणि करवीर तालुक्यातील 55 गावातील जागांमधील जमिनीचे (ज्या सामान्यत: केवळ कृषी विषयक प्रयोजनात वापरण्यात येत असतील अशा जमिनी खेरीज) भूमापन करण्याचे निर्देश 8 मार्च 2019 च्या अधिसूचनेद्वारे शासनाने दिले आहेत. नोव्हेंबर 2020 पासून भूमापन अधिकारी हे काम सुरु करतील. भूमापन अधिकाऱ्यांनी निश्चित केलेल्या तारखेस घराच्या व इतर मालमत्तेच्या बिनचूक मोजणीसाठी घर मालकाने उपस्थित राहून आवश्यक माहिती द्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी केले.
भूमापन करावयाच्या जमिनी हितसंबंध असलेल्या गहाणदार, गहाणकार, अन्यत्रवासी मालक आणि इतर व्यक्ती यांना कळविण्यात येते की, भूमापन अधिकाऱ्यांकडून यानंतर निश्चित करण्यात येईल अशा तारखेला त्यांनी हजर रहावे आणि आपले अधिकार अचूकरित्या अभिलिखित करण्यात आले आहेत. याबद्दल खात्री करुन घ्यावी. भूमापनानंतर, जमिनीवरील, मालमत्तेवरील त्यांचे अधिकार, सनदा काढून कायम निश्चित करण्यात येते. अंतर्गत मोजणीच्या प्रयोजनासाठी कोणत्याही जागांमध्ये प्रवेश करणे आवश्यक असेल त्या बाबतीत उक्त जागांच्या भोगवटादारांना 24 तासांपेक्षा कमी नसेल इतक्या मुदतीची पूर्व सूचना दिल्या खेरीज कोणताही भूमापक तीत प्रवेश करणार नाही.
जेवढ्या जमिनीचे भूमापन करावयाचे त्या जमिनीच्या मोजणीसाठी किंवा वर्गीकरणासाठी कामगारांना मंजुरीवर लावण्यासाठी किंवा भूमापनासंबंधिच्या अनुषंगिक हेतुसाठी कोणताही खर्च झाल्यास तो जमीन धारकाकडून महसूल मागणी म्हणून वसुली योग्य असेल. धारकानी अधिक सहाय्य दिल्यास भूमापनाचे काम तातडीने होईल आणि भूमापनाचा खर्च कमी होईल.
कागल तालुक्यातील गावे-ठाणेवाडी, बोळावी, बोळावीवाडी, हसुर बुद्रुक, तमनाकवाड, वडगाव, बेलेवाडी का., कासारी, बेलेवाडी मासा, बाळीक्रे, आलाबाद, मुगळी, जैन्याळ, करड्याळ, अर्जुनवाडा, नंद्याळ, अर्जुनी, लिंगनूर कापशी, गलगले, मेतके, बस्तवडे, सोनगे, कुरुकली, सुरुपली, करंजीवणे, हळदवडे, दौलतवाडी, बेनिक्रे, शिंदेवाडी, भडगाव, कुरणी, चौंडाळ, पिराचीवाडी, सावर्डे खुर्द, केनवडे, पिंपळगाव बु. केंबळी, बामणी, शंकरवाडी.
करवीर तालुक्यातील गावे-आडूर, आरळे, उजळाईवाडी, उपवडे, आरडेवाडी, कळंबे तर्फे कळे, कांचनवाडी, कांडगाव, कावणे, कुर्डू, कुरुकली, पडवळवाडी, कोगील खु., कोगील बु., कोथळी, कंदलगाव, गर्जन, गोकूळशिरगाव, घणवडे, घुंगूरवाडी, चाफोडी तर्फे आरळे, चिंचवडे तर्फे कळे, चुये, जठारवाडी, जैताळ, तामगाव, तेरसवाडी, दोनवडी तर्फे हवेली, नागाव, निठवडे, विकासवाडी, नंदवाळ, मोरेवाडी, पाटेकरवाडी, पाडळी बु., पासार्डे, शिपेकरवाडी, भाटणवाडी, भामटे, मांजरवाडी, मादळे, मांडरे, म्हारुळ, म्हलसवडे, वडगाव खु., वाडवारी, वाडीपीर, सडोली दुमाला, सरनोबतवाडी, सादळे, सावर्डे इनाम, हलसवडे, हासूर, हिरवडे खालसा, हिरवडे दुमाला.
याबाबत आज बैठक घेण्यात आली या बैठकीला जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख डॉ. वसंत निकम, निवासी उप जिल्हाधिकारी भाऊ गलांडे, नगर रचनाकार मा.अ. कुलकर्णी, ग्राम पंचायत विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण जाधव, पोलीस उप अधीक्षक सुनिता नाशिककर उपस्थित होते.
गावनिहाय समिती बनवून नियोजन करण्याचे तसेच ग्रामसभा आणि ड्रोनद्वारे गावठाण भूमापनाची पूर्व तयारी करावी. या संदर्भात 27 तारखेला संबंधित तहसिलदारांनी सर्व यंत्रणांची बैठक घेण्याची सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी केली.
000000

                  अम्हना सपोर्ट  करण्यासाटी Ads वर क्लिक करा 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area