माझे कुटुंब माझी जबाबदारी आज 39287 नागरीकांचे सर्व्हेक्षण - जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे

 
कोल्हापूर, दि. 2 : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरु झालेल्या ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या मोहिमेअंतर्गत कुटुंब कल्याण केंद्राच्या माध्यमातून केलेल्या सर्व्हेक्षणाच्या आजच्यादिवशी 11287 घरांचे आणि 39287 इतक्या लोकांची सर्व्हेक्षण करण्यात आले, असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे यांनी दिली.
‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या मोहीमेअंतर्गत आजच्या दिवशी तपासणी करण्यात आलेल्या तालुक्यातील नागरीकांची कुटुंब कल्याण केंद्र निहाय माहिती हातकणंगले 5421 घरांचे व 13254 नागरिकांचे, कागल 1595 घरांचे व 8150 नागरिकांचे, राधानगरी 214 घरांचे व 1039 नागरिकांचे, शाहूवाडी 659 घरांचे व 2251 नागरिकांचे तर शिरोळ- 492 घरांचे व 2281 नागरिकांचे असे एकूण 8381 घरांचे व 26975 नागरिकांचे सर्व्हेक्षण करण्यात आले आहे.
नगरपंचायत कागल 221 घरांचे व 952 नागरिकांचे, नगरपंचायत मुरगुड 301 घरांचे व 1088 नागरिकांचे तर नगरपंचायत जयसिंगपूर 171 घरांचे व 756 नागरिकांचे, असे एकूण 693 घरांचे व 2796 नागरिकांचे सर्व्हेक्षण करण्यात आले आहे. तर कोल्हापूर शहरातील 2213 घरांचे तर 9516 नागरिकांचे सर्व्हेक्षण करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area