आजअखेर 44 हजार 758 जणांना डिस्चार्ज

 


कोल्हापूर, दि. 25 : आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत आरटीपीसीआर आणि सीबीएनएएटी चाचणीचे 548 प्राप्त अहवालापैकी 513 निगेटिव्ह तर 22 अहवाल पॉझीटिव्ह आहेत. (13 अहवाल नाकारण्यात आले) ॲन्टीजेन टेस्टिंग चाचणीचे 155 प्राप्त अहवालापैकी 149 निगेटिव्ह तर 6 अहवाल पॉझीटिव्ह आहेत, खासगी रुग्णालये/लॅब मध्ये 120 प्राप्त अहवालापैकी 144 निगेटिव्ह 6 पॉझीटिव्ह असे एकूण 34 अहवाल पॉझीटिव्ह आहेत.
जिल्ह्यात आजअखेर एकूण 47 हजार 742 पॉझीटिव्हपैकी 44 हजार 758 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आजअखेर जिल्ह्यात एकूण 1 हजार 355 पॉझीटिव्ह रुग्ण आहेत.
आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत प्राप्त 34 पॉझीटिव्ह अहवालापैकी भुदरगड-1, गडहिंग्लज-2, हातकणंगले-4, कागल-1, करवीर-5, पन्हाळा-2, राधानगरी-1, शिरोळ-1, नगरपरिषद क्षेत्र-3, कोल्हापूर महापालिका क्षेत्र- 13 व इतर शहरे व राज्य 1 असा समावेश आहे.
आजअखेर तालुका, नपा आणि मनपा क्षेत्रनिहाय रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे - आजरा-838, भुदरगड- 1192, चंदगड- 1154, गडहिंग्लज- 1379, गगनबावडा- 140, हातकणंगले-5183, कागल-1620, करवीर-5500, पन्हाळा- 1828, राधानगरी-1210, शाहूवाडी-1273, शिरोळ- 2439, नगरपरिषद क्षेत्र-7303, कोल्हापूर महापालिका क्षेत्र- 14 हजार 495 असे एकूण 45 हजार 554 आणि इतर जिल्हा व राज्यातील – 2 हजार 188 असे मिळून एकूण 47 हजार 742 रुग्णांची आजअखेर जिल्ह्यात संख्या आहे.
जिल्ह्यातील एकूण 47 हजार 742 पॉझीटिव्ह रूग्णांपैकी 44 हजार 758 रूग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. तर एकूण 1 हजार 629 जणांचा मृत्यू झाला असल्यामुळे आजअखेर उपचारार्थ दाखल झालेल्या जिल्ह्यातील रूग्णांची संख्या 1 हजार 355 इतकी आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area