आजअखेर 45 हजार 92 जणांना डिस्चार्ज

 


कोल्हापूर, दि. 27 : आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत आरटीपीसीआर आणि सीबीएनएएटी चाचणीचे 466 प्राप्त अहवालापैकी 431 निगेटिव्ह तर 33 अहवाल पॉझीटिव्ह आहेत. (2 अहवाल नाकारण्यात आले) ॲन्टीजेन टेस्टिंग चाचणीचे 148 प्राप्त अहवालापैकी 147 निगेटिव्ह तर 1 अहवाल पॉझीटिव्ह आहेत, खासगी रुग्णालये/लॅब मध्ये 115 प्राप्त अहवालापैकी निगेटिव्ह 94 तर 21 पॉझीटिव्ह असे एकूण 55 अहवाल पॉझीटिव्ह आहेत.
जिल्ह्यात आजअखेर एकूण 47 हजार 832 पॉझीटिव्हपैकी 45 हजार 92 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आजअखेर जिल्ह्यात एकूण 1 हजार 107 पॉझीटिव्ह रुग्ण आहेत.
आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत प्राप्त 55 पॉझीटिव्ह अहवालापैकी भुदरगड-4, गडहिंग्लज-2, हातकणंगले-2, कागल-3, करवीर-2, शाहूवाडी- 12, शिरोळ-2, नगरपरिषद क्षेत्र-2, कोल्हापूर महापालिका क्षेत्र- 14 व इतर शहरे व राज्य 12 असा समावेश आहे.
आजअखेर तालुका, नपा आणि मनपा क्षेत्रनिहाय रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे - आजरा-838, भुदरगड- 1197, चंदगड- 1155, गडहिंग्लज- 1381, गगनबावडा- 140, हातकणंगले-5195, कागल-1625, करवीर-5506, पन्हाळा- 1829, राधानगरी-1211, शाहूवाडी-1293, शिरोळ- 2442, नगरपरिषद क्षेत्र-7306, कोल्हापूर महापालिका क्षेत्र- 14 हजार 512 असे एकूण 45 हजार 630 आणि इतर जिल्हा व राज्यातील – 2 हजार 202 असे मिळून एकूण 47 हजार 832 रुग्णांची आजअखेर जिल्ह्यात संख्या आहे.
जिल्ह्यातील एकूण 47 हजार 832 पॉझीटिव्ह रूग्णांपैकी 45 हजार 92 रूग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. तर एकूण 1 हजार 633 जणांचा मृत्यू झाला असल्यामुळे आजअखेर उपचारार्थ दाखल झालेल्या जिल्ह्यातील रूग्णांची संख्या 1 हजार 107 इतकी आहे.
000000

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area