राधानगरीतून 800; अलमट्टीतून 52000 क्युसेक विसर्ग सुरूकोल्हापूर, दि. 13 : राधानगरी धरणात 235.14 दलघमी पाणीसाठा आहे. आज सकाळी 7 वा. च्या प्राप्त अहवालानुसार राधानगरीतून 800, कोयनेतून 1050 तर अलमट्टी धरणातून 52000 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
पंचगंगा नदीवरील इचलकरंजी हा एक बंधारा पाण्याखाली आहे. नजिकच्या कोयना धरणात 104.612 टीएमसी तर अल्लमट्टी धरणात 123.081 टीएमसी इतका पाणीसाठा आहे.
जिल्ह्यातील धरणांमध्ये पुढीलप्रमाणे पाणीसाठा आहे. तुळशी 98.29 दलघमी, वारणा 974.19 दलघमी, दूधगंगा 719.12 दलघमी, कासारी 78.04 दलघमी, कडवी 71.24 दलघमी, कुंभी 76.61 दलघमी, पाटगाव 105.17 दलघमी, चिकोत्रा 43.12 दलघमी, चित्री 53.41 दलघमी, जंगमहट्टी 34.65 दलघमी, घटप्रभा 43.57 दलघमी, जांबरे 23.23 दलघमी, कोदे (ल. पा.) 6.06 दलघमी असा आहे.
तसेच बंधाऱ्यांची पाणी पातळी पुढीलप्रमाणे आहे. राजाराम 10.1, सुर्वे 12.6 फूट, रुई 39.10 फूट, इचलकरंजी 36 फूट, तेरवाड 35.3 फूट, शिरोळ 29.6 फूट, नृसिंहवाडी 25 फूट, राजापूर 19.6 फूट तर नजीकच्या सांगली 10 फूट व अंकली 11.11 फूट अशी आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area