कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या वर्धापनदिनानिमित्त मुख्यमंत्र्यांनी दिल्या शुभेच्छा

 


मुंबई दि.2: कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या 37 व्या वर्धापनदिनानिमित्त मुख्यमंत्र्यांनी महानगरवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत.

 

मुख्यमंत्री म्हणतात, गेले सहा महिने महापालिका आपल्या सर्व नागरिकांची सर्वतोपरी काळजी घेण्याचा कसोशीने प्रयत्न करीत आहे. त्याचबरोबर एकीकडे कोरोना प्रतिबंधक उपाययोजना सुरू असताना रिंगरोड, कोपर उड्डाणपूल यासारखी  अत्यावश्यक विकासकामे महापालिकेने सुरु ठेवली आहेत. शहराच्या अव्याहत विकासाची महापालिकेची भूमिका यातून अधोरेखित होते.

 

कल्याणसारख्या ऐतिहासिक व डोंबिवलीसारख्या सुसंस्कृत नगरातील नागरिकांनी कोरोनाविरुद्धच्या लढ्यात प्रशासनाला आतापर्यंत चांगले सहकार्य केले आहे.  यापुढेही ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या शासनाच्या मोहिमेला सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी यानिमित्ताने केले आहे.

 

या वर्धापनदिनानिमित्त महापौर, आयुक्त, पदाधिकारी, सर्व सदस्य, अधिकारी व कर्मचारी आणि नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area