केशुभाई पटेल यांच्या निधनाबद्दल राज्यपालांना दुःख

 


मुंबई, दि. 29 : गुजरातचे माजी मुख्यमंत्री केशुभाई पटेल यांच्या निधनाबद्दल महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी दुःख व्यक्त केले आहे.

 

केशुभाई पटेल एक लोकप्रिय नेते व कुशल संघटक होते. त्यांना विकासाची दृष्टी होती तसेच जनसामान्यांच्या प्रश्नांची जाण होती. दीर्घ काळ गुजरात विधानसभेचे सदस्य असलेल्या केशुभाई पटेल यांनी अखेरपर्यंत जनतेची सेवा केली. त्यांच्या निधनामुळे गुजरातच्या राजकारणातील एक मोठे पर्व संपले आहे. त्यांच्या स्मृतींना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो, असे राज्यपालांनी आपल्या संदेशामध्ये म्हटले आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area