पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर भाजीपाला रोपवाटीका योजनेचे अर्ज करण्यास मुदतवाढ

 


कोल्हापूर, दि. 23 : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर भाजीपाला रोपवाटीका योजनेत शेतकऱ्यांचा सहभाग वाढविण्याच्या दृष्टिने अर्ज करण्यास 2 नोव्हेंबर पर्यंत मुदतवाढ देण्यात येत असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानदेव वाकुरे यांनी दिली.
दिनांक 2 ऑक्टोबर पर्यंत इच्छुक शेतकऱ्यांचे अर्ज मागविण्यात आले होते. सुधारित वेळापत्रकानुसार अर्ज स्वीकारण्याची अंतिम दिनांक वाढविण्यात आली असून पात्र इच्छुक शेतकऱ्यांनी आपले अर्ज mahadbtmahait.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन किंवा तालुका कृषि अधिकारी यांच्याकडे दिनांक 2 नोव्हेंबर पर्यंत सादर करावेत, असे आवाहनही श्री. वाकुरे यांनी केले आहे. या योजनेच्या मार्गदर्शक सुचना http://www.maharashtra.gov.in या वेब पोर्टलवर उपलब्ध आहेत.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area