दर्यापूर नगरपरिषदेसह विविध इमारतींचे लोकार्पण

 


अमरावती, दि. ६ : पायाभूत  सुविधांची अधिकाधिक कामे पूर्ण करून विकासाला गती देण्याचा महाविकास आघाडी शासनाचा प्रयत्न आहे. दर्यापूर शहरात नप इमारतीसह इतर इमारतींची कामे शहराच्या लौकिकात भर घालणारी असून, येथील उर्वरित कामांसाठीही सहा महिन्यात निधी मिळवून देऊ, असे प्रतिपादन  राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी आज दर्यापूर येथे केले.

 

दर्यापूर येथील नगरपरिषदेची नूतन इमारत,  सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विभागीय व उपविभागीय कार्यालयाचे उदघाटन व जि.प. विश्राम गृहाच्या विस्तारित इमारतीचे उद्घाटन पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांच्या हस्ते झाले, त्यावेळी त्या बोलत होत्या. जलसंपदा, शिक्षण, कामगार राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू, आमदार बळवंतराव वानखडे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बबलूभाऊ देशमुख, उपाध्यक्ष विठ्ठलराव चव्हाण, सभापती बाळासाहेब हिंगणीकर, दर्यापूरच्या नगराध्यक्ष नलिनीताई भारसाकळे, माजी सभापती जयंतराव देशमुख, उपविभागीय अधिकारी प्रियांका आंबेकर, तहसीलदार योगेश देशमुख, साप्रविच्या अधीक्षक अभियंता अरुंधती शर्मा, चंद्रकांत मेहेत्रे आदी उपस्थित होते.

 

पालकमंत्री श्रीमती ठाकूर म्हणाल्या की, कोरोना संकटकाळातही विकासाची प्रक्रिया थांबलेली नाही. अनेकविध कामे पूर्णत्वास जात आहेत. उज्ज्वल परंपरा असलेल्या दर्यापूर शहराच्या लौकिकात नूतन इमारतींमुळे भर पडली आहे. यापुढेही पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी निधी कमी पडू देणार नाही.तहसील कार्यालय व इतर इमारतीसाठी आवश्यक निधीही मिळून सहा महिन्यात कामे मार्गी लागतील यासाठी प्रयत्न करू, असेही त्यांनी सांगितले.

कोरोना प्रतिबंधांसाठी दक्षता त्रिसूत्रीचा  अवलंब करण्याचे आवाहन त्यांनी केले.

आमदार श्री. वानखडे यांनीही मनोगत व्यक्त केले.

 

 

दर्यापूरचे नप उपाध्यक्ष सागर गावंडे, सभापती किरणताई गावंडे, सभापती ईबादुल्ला शाह अब्दुल्ला शाह, दिलीप चव्हाण, शहादतखान पठाण, सुधाकरराव भारसाकळे, अरुण गावंडे,  वासंतीताई मंगरूळे, अनिल जळमकर, अमोल गहरवार, प्रमोद टेकाडे, ताज खातून अजीजउल्ला खान,अस्लम अब्दुल मजिद घानीवाले, प्रतिभाताई शिवणे, महफ़ुजा बी पटेल, सुमित ढोरे यावेळी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area