बलात्कार प्रकरणी नितीन लायकर याला अटक

 इचलकरंजी/प्रतिनिधी -

इचलकरंजी  दि . ८ : पती व मुलीस ठार मारण्याची धमकी देऊन विवाहितेवर बलात्कार केल्याप्रकरणातील संशयित नितीन दिलीप लायकर (रा. साखरपे हॉस्पिटलजवळ) याला बुधवारी गावभाग पोलिसांनी अटक केली आहे. याबाबतची माहिती गावभागचे प्रभारी निरिक्षक गजेंद्र लोहार यांनी दिली.

नितीन लायकर याने पिडीत महिलेवर पती व मुलीस जीवे मारण्याची धमकी देत वेळोवेळी बलात्कार केल्याप्रकरणी गावभाग पोलिसात पिडीत विवाहितेने दोन महिन्यापूर्वी तक्रार दाखल केली आहे. मोबाईलवरुन नितीन याने कुपवाड-सांगली येथे असलेला रिकामा प्लॉट माझ्या नांवावर कर अन्यथा सांगलीतील गुंड तुमचा गेम करणार आहेत, अशी धमकी लायकर याने दिल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. त्याचबरोबर पिडीत महिला पतीसह काळ्या ओढ्याजवळून जात असताना दोघा अनोळखी व्यक्तींनी चाकूचा धाक दाखवून लायकर याच्या विरोधात पोलिसात तक्रार दिल्यास अश्‍लिल चित्रफिती व्हायरल करुन बदनामी करण्याची धमकी दिली होती. या प्रकरणी गावभाग पोलिसांनी नितीन लायकर याच्यासह तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर लायकर हा फरार झाला होता. या गुन्ह्यात अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी लायकर याने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्याचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला असून 8 दिवसात लायकर याला इचलकरंजीतील सत्र न्यायालयात हजर राहण्याचा आदेश दिले होते. त्यानुसार लायकर तीन दिवसापूर्वी येथील जिल्हा व सत्र न्यायलयात हजर झाला. न्यायालयाने त्यास अंतरीम जामीन दिला होता. सदरचा जामीन रद्द करत न्यायालयाने लायकर यास अटक करण्याचे आदेश दिले. त्यानुसार गावभाग पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area