मानवता कॅन्सर केअर सेंटरमुळे नाशिकच्या आरोग्य विकासात भर : पालकमंत्री छगन भुजबळ

 


नाशिक, दि. 25: मुंबई येथे कॅन्सरवर उपचार करणारे टाटा हॉस्पिटल, कोकिलाबेन रुग्णालयांसारखी अनेक मोठी रुग्णालये आहेत.  त्याच धर्तीवर नाशिकमध्ये कॅन्सरग्रस्त रुग्णांना योग्य व माफक दरात मानवता कॅन्सर केअर सेंटर रुग्णांना सेवा देत आहेत . तसेच मुंबई-पुण्यासारख्या सर्व वैद्यकीय सुविधांनी सुसज्ज अशा मानवता कॅन्सर सेंटरमुळे नाशिकच्या आरोग्य विकासात भर पडली असल्याचे प्रतिपादन राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले.

मायलान सर्कल जवळील एचसीजी मानवता कॅन्सर सेंटरमध्ये अद्ययावत न्यूक्लिअर मेडिसीन  विभागाची नव्याने उभारणी करण्यात आली आहे. या विभागाच्या उदघाटन पालकमंत्री श्री. भुजबळ यांचे हस्ते करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. प्रसंगी श्री. यावेळी एचसीजी मानवता कॅन्सर सेंटरचे एमडी आणि मुख्य सर्जिकल ऑन्कोलॉजिस्ट डॉ. राज नगरकर, आयमाचे अध्यक्ष डॉ. समीर चंद्रात्रे, डॉ. चैतन्य बोराडे, डॉ. प्रशांत पाटील उपस्थित होते.

श्री. भुजबळ म्हणाले, नाशिकच्या पोषक हवामानाची भुरळ प्रभु रामचंद्र, कवी कुसुमाग्रजांना देखील होती. नाशिकचे हवामान आपल्या जिल्ह्याची फार मोठी जमेची बाजू आहे. त्यामुळे जिल्ह्यात भविष्यात शैक्षणिक हब, मेडीकल हब, शेतीवर आधारित उद्योग, आय.टी.पार्क आणण्याचा मानस आहे. तसेच उत्तर महाराष्ट्रातील पहिले अद्ययावत न्यूक्लिअर मेडिसीन  विभागाचे आज नव्याने उभारणी करण्यात आली आहे. यामुळे नाशिक जिल्ह्याबरोबरचं इतरही जवळील जिल्ह्यातील कॅन्सरग्रस्त रुग्णांना यामुळे नक्कीच दिलासा मिळणार असल्याचे पालकमंत्री श्री. भुजबळ यांनी सांगितले.

आधुनिक उपचार पध्दतीमुळे कॅन्सरसारख्या रोगावर नियत्रंण मिळविणे शक्य झाले आहे. अनेक मोठे राजकीय नेते, कलाकार, खेळाडू यांनी योग्य उपचार घेऊन कॅन्सरसारख्या आजारावर मात केली आहे. त्यामुळे या आजाराला कॅन्सरग्रस्त रुग्णांनी घाबरुन न जाता मोठ्या इच्छाशक्तीने यावर मात करावी, असेही पालकमंत्री श्री. भुजबळ यांनी सांगितले.

उत्तर महाराष्ट्रातील पहिल्या अद्ययावत न्यूक्लिअर मेडिसीन  विभागाची पाहणी पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केली व त्यातील सेवा सुविधांची माहिती घेतली.

 

डॉ. राज नगरकर यांनी यावेळी सांगितले की, उत्तर महाराष्ट्रातील पहिल्या अद्ययावत न्यूक्लिअर मेडिसीन  विभागासह पेट सिटी स्कॅनची उभारणी करण्यात आली आहे. न्यूक्लिअर मेडिसीन  विभागात पेशंटला अधिक चांगल्या सेवा देण्यासाठी तज्ञ् डॉक्टरांच्या टीम बरोबरच एकाच छताखाली 2 पेट सिटी स्कॅन मशीन, गॅमा कॅमेरा, गॅलियम जनरेटर आणि 4 आयोडीन थेरपी वॉर्ड यासारख्या अत्याधुनिक सेवा देणारे एचसीजी मानवता कॅन्सर सेंटर हि पहिली संस्था ठरणार आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area