आदिवासी विकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी घेतला विभागाच्या विविध योजनांचा आढावा

 


मुंबई, दि. 8 : नगरविकास, ऊर्जा, आदिवासी विकास, उच्च व तंत्र शिक्षण, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी विभागाच्या विविध योजनांचा आढावा घेतला.

 

विधानभवनात आयोजित आढावा बैठकीत आदिवासी विकास विभागातील महामंडळाच्या खरेदी प्रक्रिया, कौशल्य विकास योजना, प्रकल्प कार्यालयामार्फत न्युक्लिअस बजेट अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या योजना आणि आस्थापना यांचा सविस्तर आढावा घेतला. यावेळी आदिवासी विकास विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

 

श्री.तनपुरे म्हणाले, आदिवासी विकास महामंडळामार्फत धान/भरडधान्य खरेदीसाठी विविध आदिवासी कार्यकारी सहकारी संस्थाची नियुक्ती केली जाते. ज्या ठिकाणी संस्था खरेदी करण्यास तयार नाही अशा ठिकाणी महामंडळाची स्वतः ची खरेदी केंद्र उघडली जातात.

 

आदिवासी संचालनालय नाशिक, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, प्रकल्प कार्यालय यांच्यामार्फत राबविण्यात येणारे प्रशिक्षण कालावधी संपला असली तरी पुन्हा सुरू करण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल. यामध्ये वेगवेगळ्या उद्योगक्षेत्रात आवश्यक असलेल्या मनुष्यबळाची कमतरता भरून काढण्यासाठी प्रशिक्षण कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. प्रशिक्षण कार्यक्रम शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area