बेटी बचाओ बेटी पढाओ” योजनेंतर्गत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना जिल्हाधिकारी निधी चौधरी यांचे हस्ते धनादेशाचे वितरण

 


अलिबाग,जि.रायगड,दि.29 :- केंद्र शासनाच्या महिला व बाल कल्याण विभागाच्या “बेटी बचाओ बेटी पढाओ” योजनेंतर्गत जिल्ह्यामध्ये इयत्ता 10 वी व इयत्ता 12 वी मध्ये तालुक्यातून प्रथम क्रमाकांने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थी-विद्यार्थींनींना त्यांच्या शैक्षणिक उन्नतीकरिता व शिक्षणास प्रोत्साहन देण्याकरिता जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्याहस्ते रु. 5 हजारच्या धनादेशाचे वितरण करण्यात आले.

यावेळी जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन मंडलिक, विस्तार अधिकारी (सां.) श्रीमती रंजिता थळे तसेच यशस्वी विद्यार्थींचे पालक व विद्यार्थी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area