महात्मा गांधी जयंतीनिमित्त समाज कल्याण विभागामार्फत व्यसनमुक्ती दिन साजरा

 


कोल्हापूर, दि. 02: राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागामार्फत नवचैतन्य व्यसनमुक्ती व पुर्नवसन केंद्र, आ.के.नगर येथे व्यसनमुक्ती दिन समाज कल्याण सभापती स्वाती सासणे यांच्या अध्यक्षतेखाली साजरा करण्यात आला.
श्रीमती सासणे यांनी महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करुन दिपप्रज्वलन केले. सल्लागार श्री. शेटये यांनी व्यसनमुक्ती केंद्रामार्फत करण्यात येत असलेल्या कार्याची माहिती दिली. समाज कल्याण अधिकारी दिपक घाटे यांनी प्रवेशितांसोबत संवाद साधला. कार्यक्रमास समाज कल्याण विभागातील कर्मचारी, व्यसनमुक्ती केंद्रातील कर्मचारी तसेच केंद्रातील प्रवेशित उपस्थित होते. आभार व्यसनमुक्ती केंद्राचे श्री. माने यांनी मानले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area