तुडतुड्यामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ मिळवून द्या – विधानसभा अध्यक्ष नाना पटोले



 भंडारा दि.24 : परतीच्या पावसामुळे नुकसान झालेल्या शेताचे तात्काळ पंचनामे करावे तसेच तुडतुड्यामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना पीक विमा योजनेचा लाभ मिळवून द्यावा, असे निर्देश विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी कृषी विभागाला दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात धान खरेदी पूर्व तयारीबाबत आज आढावा बैठक घेण्यात आली त्यावेळी ते बोलत होते. खासदार सुनील मेंढे, आमदार नरेंद्र भोंडेकर, जिल्हाधिकारी संदीप कदम, जिल्हा पुरवठा अधिकारी अनिल बनसोड, जिल्हा पणन अधिकारी महेंद्र हेडाऊ, उपनिबंधक सहकारी संस्था मनोज देशकर, माजी मंत्री विलास श्रुगांरपवार, माजी आमदार आनंदराव वंजारी व अधिकारी यावेळी उपस्थित होते.

जिल्हयात परतीच्या पावसाने १३ हजार शेतकऱ्यांचे ६ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा कृ‍षी विभागाचा नजर अंदाज आहे. सोबतच तुडतुडा व खोडकिडा रोगामुळे शेतकऱ्यांच्या धानाचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानीचा सर्वे करण्याच्या सुचना त्यांनी कृषी विभागाला दिल्या.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area