कल्याण मटका घेतल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी तिघांवर गुन्हा दाखलइचलकरंजी दि. ८ :    दीपक चंद्रकांत रावळ (वय 39 रा. तीनबत्ती चौक परिसर) यास अटक करण्यात आली आहे. तर नितीन बुगड (रा. हत्ती चौक) हा दिवाणजी व अतुल देशमाने (रा. संभाजी चौक) हा मटकाबुकी फरार आहेत. या कारवाईत 2800 रुपयांची रोकड, मोबाईल, मोपेड असा 34 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

याबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, हुलगेश्‍वरी रोड परिसरात कल्याण मटका घेतला जात असल्याची माहिती शिवाजीनगर पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी त्याठिकाणी छापा टाकला असता रस्त्यावर अ‍ॅक्टिव्हा मोपेडवर दिपक रावळ हा कल्याण मटका घेताना सापडला. मटकाबुकी अतुल देशमाने याच्यासाठी मोबाईलवरुन मटका घेत असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले. तर नितीन बुगड हा दिवाणजी असल्याचे समोर आले आहे.

शहर आणि परिसरातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी विनामास्क फिरणार्‍या तसेच सोशल डिस्टन्सिंग न पाळणार्‍यांवर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारण्यास सुरुवात केली आहे. त्या अंतर्गत इचलकरंजी शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्यावतीने 15 सप्टेंबर ते 5 ऑक्टोबर 2020 या कालावधीत विनामास्क फिरणार्‍या 1730 जणांवर कारवाई करुन 1 लाख 73 हजार रुपये दंड वसूल करण्यात आला, अशी माहिती वाहतूक नियंत्रण शाखेचे सपोनि नंदकुमार मोरे यांनी दिली.

शहर आणि परिसरात समुह संसर्गातून कोरोनाचा कहर वाढत चालला होता. तो रोखण्यासाठी प्रशासनाकडून विविध उपाययोजना सुरु असल्या तरी वारंवार सूचना करुनही मास्क न वापरणार्‍यांची संख्या अधिक होती. शिवाय सोशल डिस्टन्सिंगचा बोजवारा उडत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे कोरोनाला रोखण्यासाठी आता प्रशासनासोबत पोलिसांनाही कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानुसार मास्क न वापरणे, सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, हॅण्डग्लोज न वापरणे, सोशल डिस्टन्स न पाळणे आदी विरुध्द पोलिसांनी कारवाईची मोहिम सुरु केली आहे.

या अंतर्गत शहर वाहतूक शाखेच्यावतीने ही मोहिम तीव्र करत दररोज दंडात्मक कारवाई सुरु केली. 15 सप्टेंबर ते 5 ऑक्टोबर या कालावधीत 18 सप्टेंबर रोजी तब्बल 119 जणांवर कारवाई करण्यात आली. ही कारवाई अशीच सुरु राहणार असून नागरिकांनी शासन नियमांचे पालन करुन स्वत:सह इतरांचेही संरक्षण करावे, असे आवाहन मोरे यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area