पुणे जिल्हा बँकेचे माजी चेअरमन अशोकभाऊ काळभोर यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून भावपूर्ण श्रद्धांजली

 


मुंबई दि. 4 : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी चेअरमन, आम्हा सर्वांचे ज्येष्ठ सहकारी श्री. अशोकभाऊ काशिनाथ काळभोर यांचे आज दुःखद निधन झाले. अशोकभाऊंचे निधन आम्हा सर्वांसाठी मोठा धक्का आहे.

 

लोणी काळभोर ग्रामपंचायतीचे सदस्य, विविध सहकारी  कार्यकारी संस्थेचे संचालक ते पुणे जिल्हा सहकारी बँकेच्या चेअरमन  अशा विविध पदांवर त्यांनी काम केलं. सर्वसामान्य जनतेच्या विकासासाठी  झटणारे त्यांचं नेतृत्व होतं. त्यांच्या निधनाने पुणे जिल्ह्याच्या सामाजिक, सहकार क्षेत्रातील कर्तृत्ववान व्यक्तिमत्व हरपले आहे. आम्ही एक चांगला सहकारी गमावला आहे. काळभोर कुटुंबियांवरील या दुःखद प्रसंगी आम्ही सर्वजण त्यांच्यासोबत आहोत.

 

हे दुःख सहन करण्याची शक्ती त्यांच्या कुटुंबियांना मिळो. दिवंगत अशोकभाऊंच्या आत्म्यास चिरशांती लाभो, ही प्रार्थना. अशोकभाऊंच्या स्मृतीला भावपूर्ण श्रद्धांजली…

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area