पत्रकारितेतील आनंद संघर्षनायक आनंदा शिंगे.

 कुरुंदवाड:

निर्भीड पत्रकार म्हणून शिरोळ तालुक्या बरोबरच जिल्ह्याला माहित असणारे आनंद शिंगे यांना संघर्ष नायक पुरस्कार प्रदान करण्यात येत आहे.अत्यंत बिकट परिस्थितीत पत्रकारितेचे व्रत जोपासत असताना त्यांनी सातत्याने अन्याया विरुद्ध आवाज उठविला आहे. लोकांच्या प्रश्नासाठी प्रसंगी अत्यंत कठोरपणे लेखणीचा प्रहार करणारा आणि सत्याच्या बाजूने ठामपणे राहणारा पत्रकार म्हणून त्यांचा लौकिक आहे.त्यांच्या पत्रकारितेतील प्रवासाचा थोडक्यात आढावा.
शिरोळ तालुक्यातील शिरटी येथे 1 जून 1960 रोजी मसाजी शिंगे यांच्या घरी आनंद शिंगे यांचा जन्म झाला.आई वडील मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत होते.घरची परिस्थिती बिकट असताना पदवीचे शिक्षण घेत असतानाच वडिलांचे छत्र हरपले त्यामुळे स्वतः शेतामध्ये शेतमजुरी करून वृत्तपत्रविद्या प्राप्त केली.घराण्यात पत्रकारितेचा गंध नसताना पत्रकारीतेचा छंद कसा जोपासतात हा प्रश्न अनेकांना पडला असावा.
घरात अठरा विश्व दारिद्र्य आई-वडिलांच्या शिक्षणाचा कधीही संबंध आला नाही पत्रकारितेच्या माध्यमातून शिरोळ तालुक्याच्या विकास प्रक्रियेत त्यांचा मोलाचा वाटा आहे.राजकारण समाजकारण हा त्यांच्या आवडीचा विषय आहे.पत्रकार क्षेत्रातील आनंद शिंगे हे अजातशत्रू व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जातात माजी खासदार स्व.बाळासाहेब माने,देशभक्त स्व.रत्नाप्पाण्णा कुंभार ,स्व सारे पाटील,स्व.शामराव पाटील-यड्रावकर यांच्यातील संस्था संघर्ष जसेच्या तसे प्रसिद्ध करून त्यांच्यातील नेमका वाद जनतेसमोर मांडण्याचे धाडस त्या काळात आनंदा शिंगे यांनी निर्भीडपणे केले आहे.
आनंदा शिंगे यांनी 37 वर्षापूर्वी पत्रकारितेत स्वतःला झोकून दिले.दैनिक तरुण भारत या वृत्त पत्रावर शिरोळ तालुका प्रतिनिधी म्हणून त्यांनी 27 वर्षे काम केले आहे.अनेक ऊस आंदोलने,विविध आंदोलनाचे वृत्ताकना बरोबरच कुरुंदवाड पोलीस ठाण्याच्या गणराया अवॉर्ड कमिटीवर ते गेल्या 20 वर्षे सदस्य म्हणून काम केले आहे. कुरुंदवाड पालिकेच्या राजकारणाच्या गतिमान घडामोडीत त्यांचा नेहमीच सहभाग राहिला आहे तर सांगली आकाशवाणी केंद्रावर शिरोळ तालुक्याचा विकासपत्र
सादर करण्याची संधी त्यांना मिळाली आहे. तालुका पंचायत समिती ग्रामस्वच्छता अभियानाच्या समितीतही त्यांची निवड करण्यात आली होती

सध्या ते जागृत लोकनेता या वृत्तपत्राला तालुका प्रतिनिधी म्हणून कार्यरत आहेत.शिरोळ तालुका युवक काँग्रेस चे माजी सदस्य,किसान सभेचे माजी संचालक,कुरुंदवाड शहर पत्रकार संघाचे संस्थापक,शिरोळ तालुका श्रमिक पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष,शिरटी ज्ञानदीप शिक्षण संस्थेचे संचालक,तरुण मंडळाचे सल्लागार,महाराष्ट्र कला संस्कृती संस्थेचे उपाध्यक्ष म्हणून ते सध्या कामगिरी करत आहेत.
राष्ट्रीय नेते शरद पवार,माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी,माजी मंत्री श्रीपाद नाईक, राम नाईक,रामदास आठवले,यांच्या परखड मुलाखती बरोबरच अभिनेते अशोक सराफ,महेश कोठारे,लक्ष्मीकांत बेर्डे,निळू फुले,भालचंद्र कुलकर्णी,रवींद्र महाजनी, निवेदिता जोशी-सराफ,निशिगंधा वाढ, उषा नाईक,उषा चव्हाण,जयश्री गडकर,बाळ धुरी,दादासाहेब कोंडके,डॉ श्रीराम लागू ,प्रतीक्षा लोणकर,मकरंद अनासपुरे,तमाशा सम्राट काळूबाळू,दत्ता महाडिक, शिवराम बोरगावकर,अभिनेते गणपतराव पाटील,महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज ठाकरे,शरद उपाध्ये,निर्मिती सावंत,नाना पाटेकर यांच्या मुलाखती घेऊन त्यांच्या व्यथा आणि त्यांचा चित्रपट क्षेत्रातील चांगुलपणा समाजासमोर आनंद शिंगे यांनी आपल्या लिखाणातून मांडला आहे.
दैनिक प्रतिध्वनी पासून त्यांनी आपल्या पत्रकारितेला प्रारंभ केला दैनिक जनप्रवास अग्रदूत,किसान, प्रतिधवनी,नवा भारत दैनिक तरुण भारत या वृत्तपत्रात त्यांनी लिखाण केले आहे.त्यांना तालुका श्रमिक पत्रकार संघाचा उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार,स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा निर्भीड पत्रकार पुरस्कार मिळाले आहेत.
सन 2005 साली महापुरात मदत कार्य केले म्हणून शासनाचे प्रमाणपत्र ही त्यांना बहाल करण्यात आले आहे. तालुक्यातील ज्येष्ठ पत्रकार म्हणून त्यांनी नावलौकिक मिळवले आहे. त्यांच्या जीवनातील महत्त्वाच्या टप्प्यात दिवंगत आई-वडिलांसह शिरटीच्या माजी उपसरपंच सौभाग्यवती यशोदा आनंदा शिंगे यांचा मोलाचा वाटा आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area