वरगढ (ओडिशा) येथील हातमाग व वस्त्रोद्योग तंत्रविज्ञान पदविकेसाठी अर्ज करण्याचे आवाहन

 


मुंबई दि. 2 : केंद्र शासनाच्या भारतीय हातमाग तंत्रविज्ञान संस्थेतील सन 2020-21 या शैक्षणिक सत्राकरिता तीन वर्षीय (सहा सत्रीय) हातमाग व वस्त्रोद्योग तंत्रविज्ञान पदविका अभ्यासक्रमाच्या प्रथम सत्राकरिता महाराष्ट्र राज्यातून वरगढ (ओडिशा) येथील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील 1 जागेच्या प्रवेशसाठी पात्र उमेदवारांची निवड करण्याकरिता प्रादेशिक उपआयुक्त वस्त्रोद्योग, नागपूर/सोलापूर/मुंबई/औरंगाबाद यांचेमार्फत विहित नमुन्यात प्रवेश अर्ज दि.09/10/2020 पर्यंत मागविण्यात येत आहे.

 

प्रवेश अर्जाचा नमुना व इतर अनुषंगिक माहिती वस्त्रोद्योग आयुक्तालयाच्या वेबसाईट www.dirtexmah.gov.in वर उपलब्ध आहे. तसेच या अर्जाचा नमुना सर्व प्रादेशिक उपआयुक्त वस्त्रोद्योग यांचे कार्यालयात देखील उपलब्ध असल्याचे डॉ. माधवी खोडे चवरे (भा.प्र.से.) आयुक्त वस्त्रोद्योग, महाराष्ट्र राज्य, नागपूर यांच्यामार्फत कळविण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area