*रायगड जिल्हयातील खाजगी आस्थापनांना ऑनलाईन रोजगार मेळाव्याकरीता रिक्तपदे अधिसूचित करण्याचे आवाहन*

 



अलिबाग, जि. रायगड दि.19 :- रायगड जिल्ह्यातील सर्व खाजगी आस्थापनांना विनंती करण्यात येते की, करोना (COVID-19) मुळे आपल्या जिल्ह्यातून कुशल/अकुशल कामगारांचे स्थलांतर झालेले आहे. त्यामुळे आपल्या आस्थापनेमध्ये कुशल/अकुशल मनुष्यबळाची कमतरता भासत आहे. त्यासाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, रायगड-अलिबाग व जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी रायगड-अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 26 ते 28 ऑक्टोबर, 2020 या कालावधीत सकाळी 10.00 ते सायंकाळी 06.00 या वेळेत ऑनलाइन रोजगार मेळावा आयोजित करण्यात येत आहे. त्यासा़ठी या कार्यालयाच्या वेबपोर्टलवर नोंदणी केलेल्या आस्थापनांनी प्रथम आपल्याकडे हवे असलेले कुशल/अकुशल मनुष्यबळाची माहिती या विभागाचे वेबपोर्टल https://rojgar.mahaswayam.gov.in वर दिनांक 25 ऑक्टोबर 2020 पर्यंत भरावी. ही माहिती भरताना प्रथम उपरोक्त वेबपोर्टल सुरु करावे. त्यातील Employment-Employer (List a Job)-Employer Login या क्रमाने जाऊन आपल्या आस्थापनेचा युजर आयडी व पासवर्ड वापरुन आपल्या आस्थापनेची माहिती पहावी. त्यातील Pandit Dindayal Upadhyay Job Fair या ऑप्शनमधून दिसणा-या रोजगार मेळाव्यांच्या यादीतील आपल्या जिल्हयाच्या नावावरील View Details-Job Details-Agree and Post Vacancy-Choose Vacancy-Add New Vacancy ऑप्शनवर क्लीक केल्यानंतर रिक्तपदांची माहिती भरुन शेवटच्या पानावरील Save Vacancy वर क्लीक करावे त्यानंतर Manage Jobs and Responses या ऑप्शनमधील माहिती भरुन उमेदवारांची यादी प्राप्त करावी. सदर यादीतील उमेदवारांना वेबपोर्टलद्वारे एसएमएस व पत्र पाठवून ऑनलाईन पध्दतीने व्ही.डी.ओ. कॉल इत्यादी माध्यमातून मुलाखतीची कार्यवाही पूर्ण करुन उमेदवारांना कळविण्यात यावे. त्याचप्रमाणे ज्या आस्थापनांची यापूर्वी उपरोक्त वेबपोर्टलवर नोंदणी करण्यात आलेली नाही त्यांनी https://rojgar.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवर Employment-Employer (List a Job)-Register या क्रमाने जाऊन नवीन नोंदणी करावी व आपलेकडील रिक्तपदे उपरोक्तप्रमाणे वेबपोर्टलवर दिनांक 25/10/2020 पर्यंत नोटीफाइड करावीत. नवीन नोंदणी करताना उपरोक्त वेबपोर्टलवरील Employment-Employer (List a Job)-Register या ऑप्शन्सचा वापर करून आपल्या आस्थापनेची नोंदणी करावी. नवीन नोंदणी करताना आपले व्यवसाय सुरु करणेबाबतचे प्रमाणपत्र (Incorporation Certificate) नोंदणीमध्ये अपलोड करणे आवश्यक आहे. आपल्या आस्थापनेची नवीन नोंदणी केल्यानंतर उपरोक्तप्रमाणे आपलेकडील रिक्तपदे अधिसूचित करुन वेबपोर्टलवरील पुढील कार्यवाही करावी. वेबपोर्टलवर नवीन नोंदणी करणे व पदे अधिसूचित करणे या संदर्भात आपणास काही समस्या असल्यास या कार्यालयाचा दूरध्वनी क्रमांक 02141-222029 किंवा भ्रमणध्वनी क्र.9820452264 वर संपर्क साधावा, असे आवाहन मा. जिल्हाधिकारी, रायगड-अलिबाग, श्रीमती. निधी चौधरी व श्री. शा. गि. पवार, सहाय्यक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, रायगड-अलिबाग यांनी केले आहे.
000000

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area