स्थायी समिती आणि शिक्षण समिती अध्यक्षांचे मुख्यमंत्र्यांकडून अभिनंदन!

 


मुंबई, दि. 6 : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षपदी तिसऱ्यांदा निवडून आलेले यशवंत जाधव तसेच शिक्षण समितीच्या नवनिर्वाचित अध्यक्ष संध्या दोशी यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली, यावेळी मुख्यमंत्र्यांनी त्यांचे या विजयाबद्धल अभिनंदन केले. आज ही निवडणूक पार पडली.

 

मुख्यमंत्र्यांच्या भेटीच्या वेळी  परिवहन मंत्री अनिल परब, शिवसेना पक्ष सचिव मिलिंद नार्वेकर हे देखील उपस्थित होते.

 

यावेळी मुख्यमंत्र्यांनी मुंबई शहरातील विकास कामे आणि पालिकांच्या शाळांची शैक्षणिक घोडदौड अधिक जोमाने व्हावी, असे सांगून दोघांनाही शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area