जे.जे. महानगर रक्तकेंद्राकरिता दिलेल्या दोन आधुनिक वाहनांचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते उद्घाटन

 


मुंबई, दि. 29 : सर जे.जे. महानगर रक्तकेंद्रासाठी रक्तसंकलनाकरिता दोन वातानुकुलित वाहन देण्यात आले असून त्यांचे उद्घाटन राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते आज  करण्यात आले. या अत्याधुनिक वाहनांमुळे कमी जागेत व गृहनिर्माण संकुलांमध्ये जाऊन रक्तसंकलन करणे शक्य होणार आहे.

 

रक्तसंकलन करणारी ही वाहने वातानुकुलित असल्याने रक्तदात्यांना रक्तदानाच्या वेळेस त्रास होणार नाही. सर जे.जे. महानगर रक्तसंकलन केंद्र हे मुंबईतील सर्वात जास्त रक्तसंकलन करणारे केंद्र आहे. हे केंद्र वार्षिक 30 हजार युनिट्स संकलन करीत असून 24 तास सुरू असणारे हे एकमेव केंद्र आहे. कोरोना काळात या वाहनांद्वारे जास्तीत जास्त रक्त संकलन करून गरजू रुग्णांना मदत करावी, अशी अपेक्षा आरोग्यमंत्र्यांनी व्यक्त केली. तसेच नागरिकांनीदेखील रक्तदान करावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

 

आरोग्य संचालक डॉ. साधना तायडे, राज्य रक्त संक्रमण परिषदेचे सहसंचालक डॉ. अरूण थोरात, रक्तकेंद्राचे वैद्यकीय संचालक डॉ. हितेश पगारे आदी यावेळी उपस्थित होते.

००००

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area