कोकणातील खारजमीन विकास योजनेसंदर्भात आढावा बैठक

 


मुंबई, दि. ७ : कोकणातील खारजमीन योजनेसंदर्भात आढावा बैठक महसूल राज्यमंत्री अब्दूल सत्तार यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात घेण्यात आली. यावेळी जलसंपदा कोकणविभागाचे मुख्य अभियंता स.रा.तिरमनवार, प्रकल्प संचालक विजय थोरात, लघु पाटबंधारे विभागाच्याउपसचिव श्रीमती पुर्णिमा देसाई, सहाय्यक अधीक्षक अभियंता ध.वि.भोसले उपस्थित होते.

 

कोकणविभागातील ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधूदूर्ग जिल्ह्यातील खारभूमी विकासकामाची सद्यस्थिती, खारभूमी विकास मंडळातील मंजूर व रिक्त पदे, बृहत्‌ आराखड्यानुसार खारभूमी योजनांची सद्यस्थिती, प्रगतीपथावरील कामे, सन 2020-21 मधील मंजूर अनुदानाचातपशील, प्रगतीपथावर असलेल्या विविध योजना, 64 खाजगी खारभूमी योजना शासनाच्याताब्यात घेणे, खारभूमी विकास योजनेचा आर्थिक मापदंड सुधारित करणे, राष्ट्रीय चक्रीवादळ धोका निवारण प्रकल्पांतर्गत कामाची सद्यस्थिती, खारभूमी विकास योजनांच्याकामातील अडचणी, अपुरा निधी, प्रशासकीय मान्यता इत्यादी विषयांचा यावेळी श्री.सत्तार यांनी आढावा घेतला.

 

चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या कामाची सुरुवात, स्थानिकांकडून येणाऱ्या अडचणी, वित्त विभागाकडून येणाऱ्या अडचणी, पदभरती याबाबत वित्तमंत्री यांच्याकडे बैठक घेऊन या समस्या सोडविण्यासाठी सर्वतोपरीप्रयत्न करण्यात येईल, असेही श्री. सत्तार यांनी यावेळी सांगितले.

 

सन 2020-21 मध्ये 8 नवीन योजनेसह एकूण 28 खारभूमी योजनांची कामे प्रगतीपथावर आहेत. खारभूमी विकासासाठी आतापर्यंत 416 योजना कार्यरत आहेत, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area