*'जय महाराष्ट्र'कार्यक्रमात 'दृढनिश्चय सर्वांगीण विकासाचा'* *या विषयावर पर्यटन,फलोत्पादन, उद्योग राज्यमंत्री आदिती तटकरे यांची मुलाखत*

 


मुंबई,दि.28 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित 0'जय महाराष्ट्र' कार्यक्रमात 'दृढनिश्चय सर्वांगीण विकासाचा' या विषयावर उद्योग, खनिकर्म, पर्यटन,फलोत्पादन, क्रीडा व युवक कल्याण,राजशिष्टाचार, विधी व न्याय, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या राज्यमंत्री तथा पालकमंत्री अलिबाग (रायगड) कुमारी आदिती तटकरे यांची मुलाखत घेण्यात आली आहे. ही मुलाखत शुक्रवार दिनांक 30 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 7.30 ते ८. 00 या वेळेत प्रसारित होईल. ही मुलाखत निवेदिका रेश्मा बोडके यांनी घेतली आहे.
या मुलाखतीत राज्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी घेण्यात आलेले निर्णय,बीच शॅक धोरण,तिर्थक्षेत्र पर्यटन, फलोत्पादन विभागाच्या योजनांना देण्यात येणारी गती,क्रीडा व युवक कल्याण विभागाच्या योजना व उपक्रम,रायगड जिल्हयातील पर्यटनाला व विकासाला देण्यात येणारी गती,निसर्ग चक्री वादळामुळे जिल्हयात झालेले नुकसान व शासनाकडून करण्यात आलेली मदत, कोविड कालावधीत उद्योग विभागासाठी घेण्यात आलेले निर्णय यासंदर्भात सविस्तर माहिती राज्यमंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area