राज्यात आज कोरोनाचे १० हजार ४६१ रुग्ण बरे होऊन घरी

 

नवीन बाधित रुग्णांमध्ये ४० टक्क्यांनी घट

बरे होणाऱ्या रुग्णांमध्ये १२ टक्क्यांनी वाढ

 

• मागील ४ आठवडयातील रुग्णसंख्येचे विश्लेषण केले असता दर आठवडयाला नव्याने आढळणारे बाधित रुग्ण कमी होताना दिसत आहेत. सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवडयात १ लाख ५३ हजार ३३१ एवढे नवे रुग्ण आढळले होते. त्यांची संख्या ऑक्टोबरच्या पहिल्या आठवडयात ९२ हजार २४६ एवढी आहे. याचा अर्थ रुग्ण संख्येत जवळपास ४० टक्के घट झाली आहे.

• १० सप्टेंबर ते १० ऑक्टोबर या काळात रुग्ण बरे होण्याच्या प्रमाणात ७०.७२ टक्क्यांवरुन ८२.७६ टक्क्यांपर्यंत सुधारणा झाली आहे.

• या सोबतच प्रयोगशाळा नमुन्यांमधील पॉझिटिव्ह रुग्णांचे प्रमाण हे २४. ६ टक्क्यांवरुन १५.०६ टक्क्यांवर आले आहे.

• मागील चार आठवड्यात प्रयोगशाळा तपासणीत थोडी घट होताना दिसत आहे. याची दोन प्रमुख कारणे आहेत – पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या दैनंदिन स्वरुपात कमी होत असल्याने स्वाभाविक या बाधित रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींची संख्या कमी होत आहे आणि फिवर क्लिनिक मध्ये येणाऱ्या रुग्णांची संख्या देखील कमी होत असल्याचे निरीक्षण रुग्णालयांनी नोंदविले आहे.

• १० सप्टेंबर ते १० ऑक्टोबर या कालावधीत प्रतिदिन चाचण्यांची संख्या ८० हजारांच्या घरात आहे. परिणामी १० सप्टेंबर रोजी असणारा पॉझीटिव्हीटी दर हा २४.६० टक्क्यांवरून १० ऑक्टोबर रोजी १५.०६ टक्क्यावर आला आहे.Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area