नुकसानग्रस्तांना भरपाई मिळवून देण्यासाठी शासन कटिबद्ध – पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

 


अमरावती, दि. ५ : अतिवृष्टीमुळे घरांची पडझड होऊन नुकसान झालेल्या अमरावती व भातकुली तहसीलमधील २२ लाभार्थ्यांना राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या हस्ते  धनादेशाचे वाटप करण्यात आले.

नैसर्गिक आपत्तीत नुकसान झालेल्यांना मदत मिळवून देण्यासाठी महाविकास आघाडी शासन कटिबद्ध आहे, असे पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी यावेळी सांगितले.

अमरावती तालुक्यातील २१ लाभार्थी व पूर्णानगर येथील एका लाभार्थ्याला पालकमंत्री ॲड.  ठाकूर यांच्या हस्ते धनादेशाचे वाटप शासकीय विश्रामगृह येथे आज करण्यात आले.

भातकुली तालुक्यातील पूर्णानगर येथील एका लाभार्थ्यासह

अमरावती तहसीलमधील थुगाव,खानापूर,यावली, कठोरा गांधी, ब्राम्हणवाडा, आणि गोविंदपूर येथील 21 लाभार्थ्यांना धनादेशाचे वाटप करण्यात आले.

जि. प. चे माजी सभापती जयंतराव देशमुख, हरीभाऊ मोहोड, तालुका प्रशासनाचे अधिकारी व विविध मान्यवर यावेळी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area