नळ जोडणीची नोंद करताना येणाऱ्या अडचणी सोडविण्यावर भर द्यावा – पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील

 


मुंबई, दि. 9 :  ग्रामीण भागात नळ जोडणीची नोंद करताना अनेक अडचणी येत असतात. मात्र या अडचणी सामंजस्याने सोडवून नळ जोडणीच्या नोंदी करण्यात याव्यात, असे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले.

 

महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाच्या जळगाव जिल्ह्यातील कामांचा आढावा श्री. पाटील यांनी मंत्रालयात घेतला. त्यावेळी ते बोलत होते.

 

यावेळी आमदार किशोर आप्पा पाटील,  आमदार श्रीमती लताताई चंद्रकांत सोनावणे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव किशोर राजे निंबाळकर, व्यवस्थापकीय संचालक आर.विमला, मुख्य अभियंता चंद्रकांत गजभिये यांच्यासह प्राधिकरणाचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.

 

श्री. पाटील म्हणाले, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत जळगाव जिल्ह्यात  विविध योजनांची कामे सुरु आहेत. ही कामे प्राधान्याने पूर्ण करीत असताना येणाऱ्या अडचणी समजून घेऊन त्याचे निराकरण करणे आवश्यक आहे.

 

या बैठकीत राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमाअंतर्गत प्रगतीपथावरील योजना, जलस्वराज्य टप्पा-2 कार्यक्रमाअंतर्गत प्रगतीपथावरील योजना, राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमाअंतर्गत नवीन प्रस्तावित योजना, नगरोत्थान अभियान, अमृत योजनांतर्गत सुरु असलेल्या कामांचाही पाणीपुरवठा मंत्री श्री.पाटील यांनी आढावा घेतला.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area