रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गावठाणात गावाच्या हद्दीत घर बांधण्यासाठी परवानगी देण्यासंदर्भात बैठक संपन्न

 


मुंबई दि. 7 : रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गावठाण हद्दीमध्ये घर बांधण्यासाठी असलेल्या निकषांचा महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित बैठकीत आज आढावा घेण्यात आला. यावेळी आमदार दीपक केसरकर, वैभव नाईक आदी मान्यवर उपस्थित होते.

महसूल राज्यमंत्री श्री. सत्तार म्हणाले, गावठाणातील दोन हजार पर्यंत लोकसंख्या असलेल्या गावाची लोकसंख्या वाढवून ३ हजार करण्यात यावी. या गावातील  १५० चौकिमी क्षेत्रापर्यंतच्या भूखंडावरील रहिवास वापराच्या बांधकाम परवानगीसाठी वास्तूविशारद किंवा अभियंता यांची आवश्यकता नसेल. तसेच बांधकाम परवानगी देण्यापूर्वी लागू असलेल्या सर्व नियमांची खातरजमा नियोजन प्राधिकरणाने करणे आवश्यक राहील. नगरविकास विभागाने प्रचलित विकास नियंत्रण नियमावली विचारात घेऊन बांधकाम परवानगी देणे बंधनकारक असेल. गावठाणातील काही अधिकार ग्रामपंचायत स्तरावर देण्यात आले आहेत, असेही श्री सत्तार यांनी यावेळी सांगितले.

नगरविकास विभागाने काढलेल्या अधिसूचनेत नगरविकास विभागाने टाऊन प्लॅननुसार नियोजन करण्यात यावे असे नमूद करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area