पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांच्या उपस्थितीत करोना नियमांचे पालन करीत श्री धावीर महाराजांचा पालखी सोहळा उत्साहात संपन्न रायगड पोलिसांनी दिली श्री धावीर महाराजांना सशस्त्र मानवंदनाअलिबाग, जि.रायगड, दि.27 :- रोह्याचे ग्रामदैवत श्री धावीर महाराजांच्या पालखी सोहळ्यास आज (दि.26 ऑक्टोबर) पहाटे पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांच्या उपस्थितीत करोना नियमांचे पालन करीत मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. यावेळी रायगड पोलिसांच्या वतीने पोलीस निरीक्षक नामदेव बंडगर व पोलीस पथकाने श्री धावीर महाराजांना सशस्त्र मानवंदना दिली.
या सोहळ्यासाठी पालकमंत्री कु.आदिती तटकरे, आमदार अनिकेत तटकरे, प्रांताधिकारी डॉ.यशवंत माने, उपविभागीय पोलीस अधिकारी किरणकुमार सुर्यवंशी, तहसिलदार कविता जाधव, ट्रस्टचे अध्यक्ष प्रशांत देशमुख, कार्यवाह मकरंद बारटक्के, उत्सव समितीचे अध्यक्ष सूर्यकांत कोलाटकर, कार्यवाह सचिन चाळके, नगराध्यक्ष संतोष पोटफोड़े, उपनगराध्यक्ष महेश कोलाटकर, राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष मधुकर पाटील, माजी नगराध्यक्ष समिर शेडगे, लालता प्रसाद कुशवाह, संजय कोनकर, विश्वस्त नितिन परब, विजयराव मोरे, सुभाष राजे, समिर सकपाळ, आनंद कुलकर्णी, महेश सरदार, माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र जैन, महेंद्र दिवेकर, आप्पा देशमुख, हेमंत कांबळे, अमित उकडे, राजेश काफरे, नगरसेवक दिवेश जैन आदींसह ट्रस्ट आणि उत्सव समितीचे पदाधिकारी मंदिरात पहाटेच उपस्थित झाले होते.


करोनाच्या पार्श्वभूमीवर उत्सव अतिशय साध्या पद्धतीने साजरा झाला असला तरी या उत्सवानिमित्त मंदिराचा संपूर्ण परिसर विविध रंगी फुलांच्या सजावटीने सजविण्यात आला होता, पाण्याचे उंच कारंजे आणि सुंदर रांगोळ्यांनी वातावरण प्रसन्न झाले होते. पालखीच्या स्वागतासाठी नागरिकांनी शहरात ठिकठिकाणी फुलांनी आणि सडा-रांगोळ्यांनी रस्ते सजविलेले होते. भल्या पहाटे मंगलमय वातावरणात गोंधळ्यांच्या वाद्याने ग्रामदैवताची महाआरती संपन्न झाली. तद्नंतर या वर्षी अलिबाग येथून मागविण्यात आलेल्या रथसदृश्य वाहनामध्ये महाराजांची पालखी मार्गस्थ झाली. शहरातील ठरवून दिलेल्या मार्गावरील मंदिरात बंधूभेट देत महाराजांची पालखी काही अवधीतच मंदिरात परतली. यावेळी श्री धावीर महाराजांना पुन्हा पोलीस मानवंदना देण्यात आली.


दरवर्षी भल्या पहाटे हा सलामी सोहळा पाहण्यासाठी मंदिरात प्रचंड गर्दी होत असते. मात्र यावर्षी करोना प्रतिबंधात्मक नियमांमुळे ती यंदा फारच अत्यल्प होती. पालखीचे जवळून दर्शन कोणाला घेता आले नसले तरी पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी स्वत:च मोबाईलद्वारे फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून श्री धावीर महाराज पालखी सोहळ्याचे ऑनलाईन दर्शन नागरिकांना उपलब्ध करुन दिले. याचा लाभ अनेक भक्तांनी घेतला.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area