विजयादशमीनिमित्त राज्यपालांच्या शुभेच्छा

 


मुंबई, दि. 25 :- राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी सर्वांना विजयादशमी (दसरा) निमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.

विजयादशमीचा सण दुष्प्रवृत्तीवरील सतप्रवृत्तीच्या विजयाचे प्रतीक आहे. सत्याचा नेहमीच विजय होत असतो, हा विश्वास या सणाच्या माध्यमातून मिळतो. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सर्वांनी हा सण सुरक्षितपणे साजरा करावा, असे आवाहन करतो. ही विजयादशमी सर्वांच्या जीवनात आनंद, सुखशांती, समाधान व संपन्नता घेवून येवो. सर्वांना विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा  देतो, असे राज्यपालांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area