गांधीनगर पोलीस स्टेशनचे सहा.पोलीस निरीक्षक दीपक भांडवलकर कोरोना महायोद्धा,समाज गौरव पुरस्काराने सन्मानित.

 कोल्हापूर : (प्रतिनिधी) कोल्हापूर जिल्ह्यात २०१९ साली आलेल्या महापुरात गांधीनगर कार्यक्षेत्रातील जीवित व वित्तहानी होऊ नये यासाठी विशेष प्रयत्न केल्याबद्दल व कोरोना काळात यशस्वीरित्या जनहितार्थ कायदेविषयक आचारसंहितेची अंमलबजावणी केल्याबद्दल गांधीनगर पोलीस स्टेशनचे सहा. पोलीस निरीक्षक दीपक भांडवलकर यांना संघर्षनायक राष्ट्रीय बहुजन मिशनचे संस्थापक प्रमूख मा. संतोष आठवले यांच्या हस्ते कोरोना महायोद्धा, समाज गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.याप्रसंगी अध्यक्ष अमोल कुरणे यांनी त्यांचा विशेष सत्कार केला. यावेळी ज्येष्ठ विधिज्ञ अॅडवोकेट दत्ताजीराव कवाळे, समिर विजापूरे ,संभाजीराव पाटील , रणजित कांबळे आदी उपस्थित होते.
Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area