माजी आमदार सुरेश गोरे यांच्या निधनाबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांची श्रद्धांजली

 


मुंबई दि. १० :  पुण्याच्या राजकीयसामाजिक क्षेत्रातील सहकारीखेड-आळंदीचे माजी आमदार सुरेश गोरे यांचे निधन झाल्याचे समजून धक्का बसला. आज आम्ही आमचा जुना सहकारीपुणे जिल्ह्याने एक कार्यशील नेतृत्वं गमावले आहे. अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी श्रद्धांजली वाहिली.

शिवसेनेत असले तरी राष्ट्रवादी काँग्रेसशी ते प्रदीर्घ काळ निगडीत होते. राष्ट्रवादीशी त्यांचं वेगळे नाते होते. पुणे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष व प्रदीर्घ काळ सदस्य म्हणून काम केलेल्या सुरेश गोरे यांच्याबद्दलच्या अनेक आठवणी आहेत. गोरे कुटुंबियांच्या दु:खात आम्ही सर्वजण सहभागी आहोत. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या आत्म्यास सद्गती लाभो ही प्रार्थना, असे उपमुख्यमंत्री यांनी शोकसंदेशात म्हटले आहे.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area