मुंबई सेंट्रल येथील आग लागलेल्या सिटी मॉलला पालकमंत्री अस्लम शेख यांनी दिली भेट

 


मुंबई, दि.24 : मुंबई सेंट्रल येथील आग लागलेल्या सिटी मॉलची मुंबई शहरचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी शुक्रवारी भेट देऊन पाहणी केली. यावेळी दुर्घटनेच्या चौकशीचे आदेशही त्यांनी दिले.

 

मुंबई सेंट्रलमधील सिटी सेंटर मॉलमध्ये गुरुवारी रात्री नऊच्या सुमारास भीषण आग लागली. गेल्या 20 तासांपासून अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. परंतु, अद्याप आग आटोक्यात आलेली नाही. या आगीत मॉलमध्ये अडकलेल्या 400 हून अधिक नागरिकांची अग्निशमन दलाकडून सुखरुप सुटका करण्यात आली आहे. तर आग विझवण्याच्या प्रयत्नात अग्निशमन दलाचा एक जवान जखमी झाला आहे.

00000

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area