ऑक्टोबर महिन्याचे धान्य वाटप परिमाण जाहीर

 


कोल्हापूर, दि. 13 : जिल्ह्यातील शहरी भाग आणि तालुक्यांसाठी ऑक्टोबर 2020 करिता अंत्योदय योजनेंतर्गत धान्य वाटपाचे परिमाण जाहीर झाले असल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी दत्तात्रय कवितके यांनी दिली.
जिल्ह्यातील अंत्योदय कार्डधारकांची संख्या 53,242 आहे. तालुकानिहाय नियतनाची आकडेवारी क्विंटलमध्ये पुढीलप्रमाणे आहे. कोल्हापूर शहरातील गहू 772.75, तांदूळ 309.1, करवीर गहू 335.00, तांदूळ 134.00, पन्हाळा गहू 897.75, तांदूळ 359.1, हातकणंगले गहू 1248.00, तांदूळ 499.2, इचलकरंजी गहू 1216.75, तांदूळ 486.7, शिरोळ गहू 1160.25, तांदूळ 464.1, कागल गहू 1022.75, तांदूळ 409.1, शाहूवाडी गहू 778.25, तांदूळ 311.3, गगनबावडा गहू 219.75, तांदूळ 87.9, राधानगरी गहू 1049.5, तांदूळ 419.8, गडहिंग्लज गहू 1473, तांदूळ 589.2, आजरा गहू 940.00, तांदूळ 376.00, चंदगड गहू 1501.75, तांदूळ 600.7, भुदरगड गहू 695.00, तांदूळ 278.00.
जिल्ह्यात प्राधान्य कुटुंब लाभार्थी योजनेंतर्गत लाभार्थीला प्रती कार्ड 3 किलो गहू प्रति किलो 2 रुपये दराने आणि प्रती कार्ड 2 किलो तांदूळ प्रति किलो 3 रुपये दराने वितरण करण्यात येणार आहे.
जिल्ह्यात प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांची संख्या 22,85,599 आहे. तालुकानिहाय नियतनाची आकडेवारी क्विंटलमध्ये पुढीलप्रमाणे आहे. कोल्हापूर शहरातील गहू 8371.8, तांदूळ 5581.2, करवीर गहू 9604.65, तांदूळ 6403.1, पन्हाळा गहू 5334.06, तांदूळ 3556.04, हातकणंगले गहू 8831.7, तांदूळ 5887.8, इचलकरंजी गहू 4012.38, तांदूळ 2674.92, शिरोळ गहू 7478.73, तांदूळ 4985.82, कागल गहू 4936.53, तांदूळ 3291.02, शाहूवाडी गहू 3820.98, तांदूळ 2547.32, गगनबावडा गहू 557.55, तांदूळ 371.7, राधानगरी गहू 4012.14, तांदूळ 2674.76, गडहिंग्लज गहू 3394.26, तांदूळ 2262.84, आजरा गहू 2129.01, तांदूळ 1419.34, चंदगड गहू 3060.06, तांदूळ 2040.04, भुदरगड गहू 3024.12, तांदूळ 2016.08.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area