माजी मंत्री विनायकदादा पाटील यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांची श्रद्धांजली

 


मुंबई, दि. 25 :- देशातील सहकारी वनशेतीचे जनक अशी ओळख असलेले राज्याचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री विनायकदादा पाटील यांच्या निधनानं शेती, वनशेती, पर्यावरण, सहकार, उद्योग, राजकारण, समाजकारण, साहित्य अशा विविध क्षेत्रात स्वतंत्र ठसा उमटवणारं, कर्तृत्वं गाजवणारं, दूरदृष्टीचं नेतृत्वं हरपलं आहे. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब व कवीवर्य कुसुमाग्रजांचा आशीर्वाद लाभलेल्या ‘वनाधिपती’ विनायकदादांचं निधन ही राज्यासाठी मोठी हानी आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.

 

उपमुख्यमंत्री अजित पवार शोकसंदेशात म्हणतात, विनायकदादांनी गावच्या सरपंचपदापासून राज्याच्या मंत्रिपदापर्यंत प्रवास केला. हा प्रवास एकमार्गी नव्हता, राजकीय प्रवासाच्या बरोबरीनं समाजकारण, सहकार, कृषीविकासाच्या माध्यमातूनही सामान्य जनतेची सेवा केली. शेती आणि वनशेतीच्या क्षेत्रात अनेक प्रयोग केले. त्याचा राज्याला मोठा उपयोग झाला. वनशेतीच्या संदर्भातील त्यांच्या कार्याचा गौरव राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवर झाला. वनशेतीच्या संदर्भातील त्यांचे विचार पुढं घेऊन जाणं हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल, अशा शब्दात उपमुख्यमंत्र्यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area