पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते वाण मध्यम प्रकल्प येथे जलपूजन कार्यक्रम संपन्न

  बीड,दि, 10 :-  नागापूर तालुका परळी वैजनाथ येथील वाण मध्यम प्रकल्प येथे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते जल पूजनाचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी आमदार संजय दौंडजिल्हाधिकारी राहुल रेखावारजि. प. सदस्य अजय मुंडेसूर्यभान मुंडेमोहनराव सोळंकेभैय्या धर्माधिकारीउपसभापती श्री. मुंडेदीपक देशमुखमाजलगाव पाटबंधारे विभाग परळी वैजनाथ कार्यकारी अभियंता आर.ए. सलगरकरतहसीलदार विपिन पाटीलन. पा. मुख्याधिकारी अरविंद मुंडे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी परळी शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जल शुद्धीकरण केंद्रास भेट  देऊन पाहणी केली. यावेळी उपस्थित संबंधित अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना दिल्या. यावेळी परिसरातील पदाधिकारीअधिकारी नागरिक उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area