पालकमंत्री सुनिल केदार यांचे हस्ते हाकर्स प्लाझाचे लोकार्पण

 


वर्धा, दि. २  : फेरीवाल्यांना आपल्या वस्तूची विक्री करण्यासाठी हक्काची जागा मिळावी व फेरीवाल्यांनी शहरात अतिक्रमण करु नये यासाठी सेवाग्राम विकास आराखड्याअंतर्गत हॉकर्स प्लाझाची उभारणी केली आहे. या हाकर्स प्लाझाचे उद्घाटन आज राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास मंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री सुनिल केदार यांचे हस्ते लोकार्पण करण्यात आले.

यावेळी  जिल्हाधिकारी विवेक भीमनवार , जिल्हा पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर, निवासी उपजिल्हाधिकारी सुनील कोरडे, तहसिलदार प्रिती डूडूलकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता गजानन टाके यांची उपस्थिती होती.

हाकर्स प्लाझा मध्ये बांधण्यात आलेले गाळे   फेरीवाल्यांना तसेच बचत गटांना  बचत गटाचा  उत्पादित माल विक्री करण्यासाठी  देण्यात येणार आहे.  यामूळे फेरीवाले व बचत गटांना हक्काचे दुकान मिळणार आहे. या हॉकर्स प्लाझाचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री. केदार यांनी  केले आहे

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area