गांधी भूमी सेवाग्रामला जागतिक स्तरावर ओळख देण्याकरिता कटिबद्ध – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

 


वर्धा, दि 8:- ब्रिटिशांना चले जावं चा नारा देत ज्या भूमीतून महात्मा गांधींनी  स्वातंत्र्याची ज्योत प्रत्येक भारतीयांच्या मनात रोवली अशा पुण्यभूमी सेवाग्रामला जागतिक स्तरावर ओळख देण्याकरिता सदैव कटिबद्ध राहील, अशी ग्वाही राज्याचे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी दिली.

महात्मा गांधी यांच्या १५१ व्या  जयंतीनिमित्त सेवाग्राम विकास आराखडा उद्धाटन कार्यक्रमात  मुख्यमंत्री श्री.ठाकरे  यांनी ऑनलाइन उपस्थित राहून मार्गदर्शन केले होते. राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास, क्रीडा व युवक कल्याण मंत्री व वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री सुनील केदार यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेत महात्मा गांधीची  प्रतिमा स्वागतपर भेट देऊन मुख्यमंत्र्यांचे स्वागत केले.

यावेळी झालेल्या चर्चेदरम्यान  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सेवाग्राम विकास आराखड्याची संपूर्ण व विस्तृत माहिती घेतली. या आराखड्याकरिता निधीची कमतरता भासू देणार नाही, अशी ग्वाही या वेळी मुख्यमंत्री ठाकरे यांनी पालकमंत्री सुनील केदार यांना दिली.

वर्धा जिल्हा हा गांधी जिल्हा असून महात्मा गांधी यांच्या स्वप्नानुसार ” गाव बनाव- देश बनाव” या उक्तीप्रमाणे ग्रामीण भागातील उद्योगांना चालना देण्याकरिता विविध उपक्रम हाती घेण्यात येणार असल्याचे पालकमंत्री सुनील केदार यांनी मुख्यमंत्री यांना सांगितले. येत्या काळात वर्धा नगरीला जागतिक स्तरावर ओळख देण्याकरिता महाविकास आघाडी कटिबद्ध राहील असेही  मुख्यमंत्री ठाकरे यावेळी म्हणाले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area