माणसाचा विकास व पर्यावरणाचा विकास या दोन्ही समांतर चालला तरच पृथ्वीवरील माणसांचे अस्तित्व टिकून राहील – प्राचार्य डॉ .मधूकर बाचूळकर

 


कोल्हापूर दि .25 : समाजात न्याय मिळवून देण्यासाठी  विविध क्षेत्रात संघर्ष केलेल्या व्यक्तींचा गौरव केला जातो हे महत्वाचे आहे प्रत्येकाची संघर्ष करण्याची दिशा वेगळी असते पण न्याय मिळवून देण्यासाठी त्यांचा संघर्ष असतो माझा संघर्ष हा थोडा वेगळा आहे पर्यावरणाच्या रक्षणासाठी जंगल व वन्यजीव, पक्षी वाचवण्यासाठी मला संघर्ष करावा लागला विकासाच्या नावाखाली पर्यावरणाचे नुकसान केले जाते त्याच्याविरोधात माझा संघर्ष आहे माणसाचा विकास व पर्यावरणाचा विकास या दोन्ही समांतर चालला तरच पृथ्वीवरील माणसांचे अस्तित्व टिकून राहील अन्यथा माझ्यासारखे अनेक बाचुळकर जन्माला जरी आले तरी माणसाचा विनाश कुणीही थांबू शकणार नाही असे उद्गार प्राचार्य डॉक्टर मधुकर बाचुळकर यांनी संघर्षनायक राष्ट्रीय पुरस्कार स्वीकारताना व्यक्त केलेजनता संघर्ष दल , संघर्षनायक राष्ट्रीय बहुजन मिशन ,संघर्षनायक मीडिया यांच्या वतीने यंदाचा दिला जाणारा संघर्षनायक राष्ट्रीय पुरस्कार प्राचार्य डॉ . मधूकर बाचूळकर ( पर्यावरण तज्ञ , पँथर दिपक केदार(राष्ट्रीय अध्यक्ष ऑल इंडिया पँथर सेना ) आनंदा शिंगे ( जेष्ठ पत्रकार) बाबासाहेब नदाफ ( राष्ट्रीय संघटक राष्ट्र सेवा दल ) मच्छिंद्र काडापूरे ( जेष्ठ आंबेडकरवादी कार्यकर्ते ) यांना व राज्यस्तरीय पुरस्कार माया प्रकाश रनवरे (असोसियशन ऑफ अफेक्टेड पीपल लेप्रसी) राजेंद्र आनंदराव प्रधान (एकपात्री नाट्य कलाकार ) रवी नौशाद जावळे (संस्थापक-अध्यक्ष अध्यक्ष माणुसकी फाउंडेशन महाराष्ट्र राज्य ) राहुल (दादा ) पालांडे राज्य अध्यक्ष लोककल्याण ग्राहक संरक्षण संस्था महाराष्ट्र यांना संघर्षनायक मीडिया चे संपादक संतोष आठवले व फिरोज मुल्ला सर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला

पुरस्कार वितरण सोहळा ऑनलाइन वेबिनार मध्ये प्रमुख वक्ते माजी न्यायमुर्ती बी जी कोळसे-पाटील यांनी मार्गदर्शन केले . तसेच यावेळी ऑल इंडिया पँथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष पँथर दिपकभाऊ केदार यांचे तडाखेबंद भाषण झाले .कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जनता संघर्ष दलाचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष फिरोज मुल्ला होते
 पुरस्कार वितरण समारंभ दिनांक शनिवार 24 ऑक्टोबर रोजी दुपारी तीन वाजता महाराष्ट्र राज्य  मराठी पत्रकार संघ सभागृह एम्पायर टॉवर दसरा चौक कोल्हापूर येथे संपन्न झाला

यावेळी प्रमुख अतिथी  डॉ . अनिल माळी जिल्हा शल्यचिकित्सक कोल्हापूर ,जेष्ठ कवी पाटलोबा पाटील , पत्रकार दगडू माने , वॉल्टर सलढाणा जनरल सेक्रेटरी जनता संघर्ष दल , प्रवीण खताळ ठाणे जिल्हा अध्यक्ष जनता संघर्ष दल अमोल वेटम जनरल सेक्रेटरी रिपब्लिकन स्टूडेंट इंडियन, सौ . लक्ष्मी कोळी जिल्हाध्यक्ष कोल्हापूर जनता संघर्ष दल मनोज शिंदे सांगली जिल्हा अध्यक्ष जनता संघर्ष दल , हुसेन मुजावर कार्याध्यक्ष दलित महासंघ ,गौतम भगत, आकाश कांबळे ,अमित वेटम ऑल इंडिया पँथर सेना , सांगली आदीं उपस्थित होते  
कार्यक्रमाचे  संयोजन संघर्षनायक मीडियाचे व्यवस्थापक समीर विजापूरे व परिवर्तन फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अमोल कुरणे यांनी केले तर आभार हुसेन मुजावर यांनी मानले

पुरस्कार वितरण सोहळ्याचे थेट प्रेक्षपण Sangharshnayak Twentyfour या फेसबूक पेज Sangharshnayak24  युट्यूब चॅनल वर प्रसारीत करण्यात आले .

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area